राज्यातील ‘ या ’ शहरात प्रथमच डिझेल ८० च्या वर

सलग तीन दिवसांपासून होयेतय वाढ
राज्यातील ‘ या ’ शहरात प्रथमच डिझेल ८० च्या वर

औरंगाबाद : Aurangabad

गेल्या तीन दिवसांपासून औरंगाबाद मधील डिझेल दरामधील वाढ सुरू होती. गुरूवारी (१६ जुलै) या दरवाढीला ब्रेक मिळाला आहे. गेल्या सतरा दिवसात डिझेलचे दर पाचव्यांदा वाढले आहे. या सतरा दिवसात पेट्रोलचे दरात एकही पैशांची वाढ झालेली नाही.

औरंगाबाद शहरातील पेट्रोल पंप गेल्या १० जुलै पासून बंद आहे. सध्या जीवनावश्यक वस्तुंची वाहतूक सुरू आहे. यामुळे सध्या डिझेल किंवा पेट्रोलची विक्री कमी झालेली आहे. याशिवाय जालना, लातूर आणि अन्य भागातही संचारबंदीमुळे पेट्रोल आणि डिझेलची विक्री घटली आहे. तरीही डिझेलच्या दरात वाढ कायम आहे. २७ जुन पर्यंत डिझेल ७९.७८ रूपये प्रतिलिटरपर्यंत पोहोचले होते. २९ जुनला डिझेलचे दर १२ पैशांनी वाढले होते.

दि.२९ जुनला ७९.९० रूपये प्रती लिटर दराने विकण्यात आले होते. २९ जुननंतर ७ जुलैला डिझेलच्या दरात वाढ झाली होती. ७ जुलैला डिझेलच्या दरात २६ पैशांनी वाढल्याने ८०.१६ रूपये प्रति लिटर दराने विकण्यात आले होते. ७ जुलै नंतर १२ जुलैला डिझेलच्या दरात १५ पैशांनी वाढ झाली. १२ जुलैला ८०.३१ रूपये प्रतिलिटरने विकण्यात आले आहे.

दि.१३ जुलैला डिझेलच्या दरात १० पैशाने वाढ झाली. तर १५ जुलै १३ पैसे दर वाढले आहे. गेल्या तीन दिवसात ३८ पैशांची वाढ झालेली आहे. १५ जुलै रोजी ८०.५४ रूपये प्रति लिटर दराने डिझेल विकले जात आहे.

गेल्या सोळा दिवसात पेट्रोलच्या दरात एकही पैसा वाढलेल्या नाही. यामुळे ३० जुन रोजी ८८.२५ रूपये प्रतिलिटर दर होते. १६ जुलैलाही याच दराने पेट्रोलची विक्री होत आहे. १७ जुलै रोजी डिझेलच्यादरात पुन्हा सोळा पैशांची वाढ झालेली असून ८० रूपये ७० पैसे दराने डिझेलची विक्री होत आहे.

डिझेल दरामध्ये वाढ झाल्याने ट्रान्सपोर्ट, ट्रॅव्हल्ससह विविध हॉस्पीटल, विविध संस्थेसाठी असलेल्या जनरेटरच्या इंधनासाठी या डिझेलचा वापर होत आहे. याचा फटका हा व्यवसायीकांना सोसावा लागत आहे.

मराठवाड्यातील प्रमुख शहरांमध्ये असे आहेत डिझेलचे दर

औरंगाबाद : ८०.७०

बीड : ७९.२५

जालना : ७९.६५

नांदेड : ८०.२२

लातुर : ७९.३०

उस्मानाबाद : ७८.८१

परभणी : ८०.३०

हिंगोली : ७९.२७

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com