औरंगाबाद जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 220 कोरोनामुक्त

279 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद जिल्ह्यात 1 लाख 43 हजार 220 कोरोनामुक्त

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद जिल्ह्यात आज 62 जणांना (मनपा 17, ग्रामीण 45) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लाख 43 हजार 220 (Corona) कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 31 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या (Corona patient) एक लक्ष 46 हजार 972 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 473 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 279 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

आढळलेल्या रुग्णांचा तपशील

मनपा (12)

भावसिंगपुरा (1), कैलास नगर (1), संजिवनी कॉलनी (1), अन्य (9)

ग्रामीण (19)

गंगापूर (2), कन्नड (2), सिल्लोड (2), वैजापूर (10), पैठण (3)

मृत्यू (2)

घाटी (2)

1. 66, पुरूष, वैजापूर

2. 78, पुरूष, बंजारा कॉलनी

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com