औरंगाबादमध्ये आजवर 51 हजार जणांनी विकत घेतली लस

महापालिकेकडील लसींचा साठा संपला
औरंगाबादमध्ये आजवर 51 हजार जणांनी विकत घेतली लस

औरंगाबाद - Aurangabad

सरकारच्या निर्देशानुसार पालिकेने शहरातील 38 रुग्णालयांना विकत लस देण्यासाठी मुभा दिली आहे. यातील 24 रुग्णालये महात्मा फुले आरोग्य योजना (Mahatma Phule Health Scheme) लागू असलेले आहेत. तर उर्वरित या योजनेबाहेरचे आहेत. शहरात नऊ रुग्णालयांनीच 89 हजार 970 लसी खरेदी केल्या आहेत. याठिकाणी आजवर 51 हजार जणांनी विकत लस घेतली आहे. यात (Bajaj Hospital) बजाज रुग्णालयाकडे 25 हजार 10 लसी शिल्लक आहेत, असे पालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. नीता पाडळकर (Medical Officer Dr. Nita Padalkar) यांनी स्पष्ट केले.

शहराला कोरोनाच्या (Corona) संभाव्य तिसर्‍या लाटेपासून वाचवायचे असेल तर किमान 70 टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. मात्र केंद्र व राज्य सरकारकडून लसींचा साठा उपलब्ध होत नसल्याने महापालिकेच्या जम्बो लसीकरण मोहिमेला ब्रेक लागला आहे. महापालिकेकडील लसींचा साठा संपलेला असताना खासगी रुग्णालयांकडे मात्र तब्बल 38 हजार लसींचा साठा शिल्लक असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे नागरिकांना नाइलाजाने खासगीत पैसे देत लस घ्यावी लागत आहे.

18 ते 44 वर्षावरील नागरिकांचे गतीने लसीकरण करण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. मात्र सरकारकडून कोरोना प्रतिबंधक लसीच उपलब्ध होत नसल्याने पालिका प्रशासन चिंतेत आहे. सरकारकडून जशी लस उपलब्ध होईल त्याप्रमाणात पालिकेकडून सध्या लसीकरण मोहीम राबवली जात आहे. मागील काही दिवसांपासून लसींचा तीव्र तुटवला जाणवत असून अनेक नागरिकांचा दुसरा डोस घेण्याची तारीख निघून गेली आहे. परिणामी, नागरिक लस कधी येणार? याची विचारणा करण्यासाठी पालिकेच्या केंद्रांवर रोज खेट्या मारत आहे.

या पार्श्‍वभूमीवर खासगी रुग्णालयांना थेट कंपनीकडून लस खरेदी करून ती नागरिकांना देण्याची परवानगी केंद्र सरकारने दिली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांपासून शहरातील खासगी रुग्णालये नागरिकांकडून पैसे घेऊन लस देत आहेत. त्यासाठीचे दरही ठरवून देण्यात आले आहेत. मोफत लसीसाठी लागणार्‍या रांगा व वारंवार निर्माण होणारा तुटवडा यामुळे दुसरा डोस चुकवू नये, यासाठी नागरिक खासगीतून लस घेत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com