शिंदे गटातील आ. शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका!

एअर अँब्युलन्सने मुंबईला हलवले 
शिंदे गटातील आ. शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका!

औरंगाबाद- Aurangabad

औरंगाबाद पश्चिमचे आमदार संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) यांना सोमवारी रात्री हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यांना सिग्मा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले असता मुंबईला (Mumbai) हलवावे लागेल असे स्पष्ट झाले. त्यामुळे पुढील उपचारासाठी तातडीने एअर अँब्युलन्सच्या (Air Ambulance) मदतीने मुंबईला रवाना करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील सत्तांतर नाट्यात शिंदे गटाकडून आमदार शिरसाट यांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. मंत्रिमंडळ विस्तारात त्यांचे नाव नसल्याने शिरसाट यांच्या समर्थकांमध्ये कमालीची नाराजी पसरली होती. मात्र, पत्रकार परिषद घेऊन शिरसाट यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले होते. दरम्यान, दोन दिवसांपासून त्यांना अस्वस्थ वाटत असल्याची तक्रार त्यांनी स्वतः बोलून दाखवली असतानाच सोमवारी रात्रीच्या सुमारास आमदार शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आला.

औरंगाबाद शहरातील सिग्मा हॉस्पिटलमध्ये (Sigma Hospital) त्यांच्यावर उपचार करण्यात आले. दरम्यान, पुढील उपचारासाठी त्यांना आज मंगळवारी सकाळी राज्याची राजधानी मुंबईला हलवण्यात आले आहे. माजी मंत्री तथा विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी पुकारलेल्या बंडात संजय शिरसाट (MLA Sanjay Shirsat) सहभागी होते. 

औरंगाबाद पश्चिम विधानसभामधून शिरसाट निवडून आलेले आहेत. तीन वेळा म्हणजे विजयाची हॅट्रिक त्यांनी साधलेली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः आमदार शिरसाट यांची विचारपूस करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. 

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com