१८ महिन्यात 'Koo' ॲप केले इतक्या युजर्सनी डाऊनलोड

१८ महिन्यात 'Koo' ॲप केले इतक्या युजर्सनी डाऊनलोड

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

कू ॲपची (Koo App) लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत चालली आहे. भारताच्या 'कू' ॲपने नुकताच १ कोटी युजर्सचा टप्पा पार केला आहे...

कंपनीचे सहसंस्थापक अप्रमेय राधाकृष्ण (Aprameya Radhakrishna) यांनी सांगितले की, पुढील वर्षात ही संख्या १० कोटींवर नेण्याचे लक्ष ठेवले आहे. कू ॲपची अजून सुरुवातच आहे. सद्यस्थितीत इंटरनेटचा (Internet) वापर करणाऱ्यांच्या संख्येत फक्त २ टक्के युजर मायक्रोब्लॉगिंगचा (microblogging) वापर करतात.

फक्त इंग्रजी पाहिले तर ही संख्या २ टक्के इतकी सीमित आहे. म्हणजे ९८ टक्के युजर्सला अजूनदेखील मायक्रोब्लॉगिंग काय याची माहिती नाही. यावरच आमच्या कंपनीने आता लक्ष केंद्रित केले आहे.

ट्विटरला (Twitter) स्पर्धा म्हणून कू ॲपची सुरुवात करण्यात आली आहे. साधारण सव्वा ते दीड वर्षात कू ॲपची युजर्स संख्या १ कोटीपेक्षा अधिक झाली आहे. फेब्रुवारीमध्येच ८५ लाख डाऊनलोड (Download) झाले आहेत. आजच्या काळात ७० कोटी लोक इंटरनेटचा वापर करत आहेत.

या लोकांवर लक्ष केंद्रित करून त्यांना अपमध्ये जोडण्याचा प्रयत्न आम्ही करत आहे. अनेक केंद्रीय मंत्री, सरकारी अधिकारी, सेलेब्रिटी आणि काही परदेशी सरकारे कू ॲपचा वापर करीत असल्याचे देखील अप्रमेय राधाकृष्ण यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com