जलयुक्त शिवार अभियान प्रभावीपणे राबवा-जिल्हाधिकारी
औरंगाबाद - aurangabad
जलयुक्त शिवार अभियन 2.0 (Jalyukta Shivar Abhiyan) राबविण्यासाठी सर्व विभागाच्या समन्वयाने शिवार फेरीच्या माध्यमातून गावाचा जलआराखडा तयार करुन जलयुक्त शिवार अभियान 2.0 प्रभावीपणी राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी (Collector) आस्तिककुमार पाण्डेय यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात जलयुक्त शिवार अभियान 2.0 या जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विकास मीना, सिल्लोडचे सहायक जिल्हाधिकारी कुलदिप जंगम, भूसंपादन विभागाचे उपजिल्हाधिकारी संदीप पाटील, जिल्हा जलसंधारण अधिकारी सुरज शिंदे, विभागीय वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण प्रशांत वरुडे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बी.एस.तौर, जलसंधारण अधिकारी एन.जी.जाधव, वरिष्ठ भूवैज्ञानिक प्रकाश शेलार, सर्व तालुका कृषी अधिकारी व दुरदृश्यप्रणालीद्वारे सर्व तर तहसिलदार या बैठकीस उपस्थित होते.