शासकीय योजना प्रभावीपणे राबवा

सुभाष पारधी यांची सूचना
शासकीय योजना प्रभावीपणे राबवा

औरंगाबाद – Aurangabad

पैठण (Paithan) तालुक्यातील कारकीन याठिकाणी अनुसूच‍ित जातीतील वस्तींमध्ये शासनाच्या सर्व योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात यावी, अशा सूचना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य सुभाष पारधी (Subhash Pardhi) यांनी अधिकाऱ्यांना केल्या.

कारकीन येथे अनुसूचित जाती वस्तीतील प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजना (Pradhan Mantri Ujjwala Gas Yojana), रस्ते, पाणी, सांडपाणी, शौचालय व्यवस्था, सार्वजनिक नळ, वीज जोडणी, पथदिवे, हातपंप आदींचा आढावा श्री. पारधी यांनी घेतला. याप्रसंगी श्री. पारधी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. मंगेश गोंदावले, जिल्हा पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील, मागासवर्ग आयोगाच्या उपसंचालक अनुराधा दुसाने, उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे, पोलिस उपअधीक्षक गोरख भामरे, तहसीलदार चंद्रकांत शेळके, समाज कल्याण विभागाचे सहायक आयुक्त पी.जी. वाबळे, कारकीनच्या सरपंच भारती नवले, चंद्रकांत हिवराळे आदींसह जिल्हा परिषद, ग्रामपंचायतचे अधिकारी, पदाधिकारी यांची उपस्थिती होती.

पारधी म्हणाले, गावाच्या विकासाला शासनाचे प्राधान्य आहे. केंद्र, राज्य शासनाच्या विविध योजना, निधींचा वापर कारकीनसाठी करण्यात येईल. याठिकाणी शासनाच्या सर्व योजना राबविण्याबाबत संबंधित अधिकारी यांनी विशेष लक्ष द्यावे, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना केल्या. गावामध्ये असलेल्या सोयी सुविधा, आवश्यक सुविधांबाबतचे सर्वेक्षण तत्काळ करावे. या सुविधांचा आढावाही घेण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर प्रशासनास जनेतेनेही सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. पारधी यांच्या हस्ते कारकीन येथील ग्रामस्थांना प्रातिनिधिक स्वरूपात शिधापत्रिकांचे वाटप करण्यात आले.

जिल्हाधिकारी चव्हाण यांनी जिल्हा प्रशासनाकडून गावाकरीता विविध विकासाच्या योजना राबविण्यात येतील. जनतेनेही गाव स्वच्छ ठेवावा, कोविड प्रतिबंधात्मक उपाययोजनांचे पालन करावे, लसीकरण करून घ्यावे, वृक्ष लागवड करावी, असे ग्रामस्थांना आवाहन केले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com