Thursday, April 25, 2024
HomeUncategorized‘सुंदर माझे कार्यालय’प्रभावीपणे राबवा

‘सुंदर माझे कार्यालय’प्रभावीपणे राबवा

औरंगाबाद – Aurangabad

कन्नड येथील (Kannada Sub-Divisional Officer) उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील कार्यालयाच्या नूतन इमारतीची पाहणी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी केली. या भेटी दरम्यान अधिकारी-कर्मचारी यांची बैठक घेत कार्यालयीन कामासह सुंदर माझे कार्यालय संकल्पना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.

- Advertisement -

जिल्हाधिकारी चव्हाण (Collector Sunil Chavan) यांच्या अध्यक्षतेखाली कन्नड तहसील कार्यालयात आढावा बैठक पार पडली. बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तालुका कृषी अधिकारी बाळराजे मुळीक, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार मोनाली सोनवणे, नायब तहसीलदार साहेबराव घोडके आदींची उपस्थिती होती. उपविभागीय अधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी चव्हाण यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

कन्नड ग्रामीण रुग्णालयातील ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाची पाहणीही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी केली. वैद्यकीय अधीक्षक डॉ. दत्ता देगावकर, डॉ.प्रवीण पवार, डॉ.मनीषा मोतींगे आदींची यावेळी उपस्थिती होती. डॉ. देगावकर यांनी रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांना माहिती दिली.

अत्याधुनिक रोपवाटिकेची पाहणी

नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा) योजनेंतर्गत कन्नडमधील मुंडवाडीतील तेजराव बारगळ, कल्पना बारगळ यांच्या अंकुर रोपवाटिकेला जिल्हाधिकारी चव्हाण यांनी भेट दिली. रोपवाटिकेतील पॉलिहाऊस, शेडनेट, रोपांवरील प्रक्रिया, रोपांची निगा, अत्याधुनिक यंत्रणेच्या साहाय्याने तयार केलेली रोपे, भाजीपाला, झेंडू, पपई, शेवंती आदी रोपांची माहिती बारगळ यांनी जिल्हाधिकारी चव्हाण यांना दिली. यावेळी डॉ. गव्हाणे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी डॉ.तुकाराम मोटे, विधाते, उपविभागीय कृषी अधिकारी चव्हाण आदींची उपस्थिती होती. हतनूर येथील कृषी भूषण, शेतकरीनिष्ठ संतोष जाधव यांच्या अद्रक वॉशिंग सेंटरला (Washing center) भेटही जिल्हाधिकारी चव्हाण यांनी देऊन त्यांच्याशी चर्चा केली.

- Advertisment -

ताज्या बातम्या