अनैतिक संबंध ; पतीला सुपारी देऊन मारले

प्रियकरासह चौघे जेरबंद
अनैतिक संबंध ; पतीला सुपारी देऊन मारले

औरंगाबाद- Aurangabad

एक लाख रुपयांची सुपारी देऊन पत्नीने अनैतिक संबंधामध्ये (Immoral relationships) अडथळा ठरणाऱ्या पतीचा खून केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मृताची पत्नी, तिच्या प्रियकरासह चार संशयितांच्या मुसक्या चिकलठाणा पोलिसांनी शुक्रवारी आवळल्या.

पिसादेवी परिसरातील नाल्यात गुरुवारी युवकाचा मृतदेह आढळला. त्याच्या आधारकार्डवर रामचंद्र रमेश जायभाये असे नाव आढळले. तपासासाठी पोलिसांनी दोन पथके तयार केली. संशयावरुन मृताची पत्नी मनीषा व तिचा प्रियकर गणेश उर्फ समाधान सुपडु फरकाडे याचा शोध घेत ताब्यात घेतले. चौकशीत मनीषा व गणेश यांनी हत्येसाठी, राहुल आसाराम सावंत (रा. सातारा परिसर) व निकितेश अंकुश मगरे (रा. बालाजीनगर, मोंढा नाका) यांना एक लाख रुपयांची सुपारी दिल्याचे समोर आले. २० ऑक्टोबरच्या रात्री रामचंद्र जायभाये घरात झोपलेले असताना, फरकाडे, सावंत, मगरे हे तिघे घरात आले.

मनीषाने त्यांना मदत केली. सर्वांनी त्यांच्या मानेवर धारदार चाकुने वार केले. नंतर मृतदेह नाल्यात फेकून दिला, अशी कबुली मनीषाने दिल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यावरुन सावंत व मगरे याचा शोध घेत त्यांना अटक करण्यात आल्याचे चिकलठाणा पोलिसांनी सांगितले.

कृष्णा रमेश जायभाये यांच्या फिर्यादीवरुन आरोपींविरुद्ध चिकलठाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस अधीक्षक निमीत गोयल, अप्पर पोलिस अधिक्षक डॉ. पवन बनसोड, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल नेहुल यांच्या मार्गदर्शनाखाली चिकलठाणा पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक गजानन जाधव, पोलिस उपनिरीक्षक बालाजी ढगारे, अशोक रगडे, अश्विनी कुंभार, पोलिस हवालदार अजिनाथ शेकडे, बाबासाहेब मिसाळ, सुरेश साळवे, रवींद्र साळवे, दीपक देशमुख, दीपक सुरोशे, विशाल नरवडे, सुग्रीव घुगे, विशाल लोंढे, गणेश खरात, कृष्णा बरबडे, सचिन रत्नपारखे, तनुजा गोपाळघरे, ज्योती जैस्वाल, सीमा घुगे यांनी ही कामगिरी केली. या हत्येप्रकरणी संशयितांना शुक्रवारी ताब्यात घेण्यात आले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com