अवैध मुरुम उपसा ; या कंपनीला १४ ठोठावला कोटींचा दंड

अवैध मुरुम उपसा ; या कंपनीला १४  ठोठावला कोटींचा दंड

औरंगाबाद - aurangabad

नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचे (Nagpur-Mumbai Samriddhi Highway) ठेकेदार एल अँड टी या कंपनीला (L&T Company) अवैध मुरुम उपसा केल्याप्रकरणी बैजापूरच्य तहसीलदारांनी (Tehsildar of Baijapur) ९४ कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे.

एल अँड टी कंपनीने समृद्धी महामार्गाच्या कामासाठी परिसरातील मुरुम, माती मोठ्या प्रमाणावर उपसा केलेली आहे. यात कंपनीने लाखो ब्रास मुरुम विनापरवानगी उत्खनन करून वापरला आहे. असेच एका प्रकरणात अमानतपूरवाडी येथील एका खासगी जमिनीतून कंपनीने सुमारे ८१,००० घन मीटर मुरुम अवैधपणे उत्खनन करून वापरला. याबाबत विपीन बबनराव साळे यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने तहसीलदार अन्वये एल अँड टी कंपनीला २३४९८ ब्रास मुरुम अवैधपणे उत्खनन केल्याबद्दल रुपये १२०० प्रततिब्रास याप्रमाणे रुपये २,८१,९७,६०० इतक्या बाजार मूल्याची आणि पाच पट दंडाची रक्‍कम अशी एकूण चौदा कोटी नऊ लाख अट्ट्याऐंशी हजार इतका दंड भरण्याचा आदेश दिला आहे. अशाप्रकारे एखाद्या मोठ्या कंत्राटदाराला एवढा मोठा दंड झाल्याची तालुक्‍यांतील ही पहिलीच घटना आहे. आता याबाबत तहसील प्रशासन दंड वसुलीसाठी कितपत पुढाकार घेते याकडे तालुक्‍याचे लक्ष लागलेले आहे.

समृद्धी महामार्गाच्या कंत्राटदार कंपनी एल अँड टी यांनी ८१,००० घन मीटर (ब्रास) अवैध मुरुम उत्खनन केलेले आहे. तहसीलदार वैजापूर आणि उपअधीक्षक भूमी अभिलेख यांनी केलेल्या तपासणी आणि पंचनाम्याच्या आधारे तहसीलदार वैजापूर यांनी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ मधील कलम ४८ (७) व (८) वैजापूर यांनी या प्रकरणात कमी उत्खनन दाखवले आहे. या आदेशाविरोधात मी जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे दाद मागणार आहे, असे तक्रारदार विपीन काळे यांनी सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com