खबरदार... विनामास्क फिराल तर होणार दंड

औरंगाबादेत मोठी कारवाई
खबरदार... विनामास्क फिराल तर होणार दंड

औरंगाबाद - aurangabad

औरंगाबाद महापालिकेच्या (Aurangabad Municipal Corporation) निर्णयामुळे विनामास्क गाडी चालवणे आता चांगलेच महागात पडू शकते. महापालिका आता विनामास्क वाहन चालवणाऱ्या चालकांचे त्यांच्या वाहनासहित फोटो काढून थेट आरटीओ कार्यालयात पाठवणार आहे. त्यानंतर या चालकांवर आरटीओ (rto)_दंडात्मक कारवाई करणार आहे.

विनामास्क दुचाकीवर किंवा वाहनातून फिरत असाल व आपल्याकडे काेणाचेही लक्ष नाही, अशा भ्रमात तुम्ही असाल तर ताे तातडीने दूर करा. कारण शहरात विनामास्क फिरणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश महापालिका (Municipal Corporation) प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी दिले आहेत. त्यानुसार हर्सूल टी पॉइंट, बाबा पेट्रोल पंप, सिडको बसस्थानक चौक येथे अशा ९० वाहनचालकांचे फोटो मनपाच्या पथकातील कर्मचाऱ्यांनी काढून आरटीओ कार्यालयाला पाठवले. या कार्यालयाकडून संबंधित वाहनचालकांना दंड ठोठावण्यात येणार आहे.

कोरोनाचा (corona) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी ओमायक्रोन विषाणूचा शिरकाव होऊ नये म्हणून खबरदारी घेतली जात आहे. साेमवारी जिल्हा टास्क फोर्सची बैठक झाली. तीत विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी व मनपा प्रशासकांनी सांगितले. अनेक वाहनचालक विनामास्क फिरतात पण हाती लागत नाहीत, असे कर्मचाऱ्यांचे अनुभव हाेते. त्यामुळे आता अशा वाहनांच्या नंबर प्लेटचे व चालकांचे फाेटाे काढून ते आरटीओला पाठवण्यात येणार आहेत. त्यानुसार मंगळवारी हर्सूल टी पॉइंट येथे २५, बाबा पेट्रोल पंप येथे ३० व सिडको बसस्थानक चौक येथे ३५ विनामास्क वाहन चालवणाऱ्या वाहनचालकांचे फोटो काढून आरटीओ कार्यालयाला पाठवण्यात आले. दरम्यान, महापालिका कर्मचाऱ्यांनी या तिन्ही ठिकाणी माझे कुटुंब माझी जबाबदारी असे संदेश देणारे टी-शर्ट, टोपी व मास्क घालून मास्क व लसीकरणाबाबत जनजागृती केली, अशी माहिती आरोग्य अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com