लॉकडाऊन नसता तर पॅरासिटामोल गोळीही मिळाली नसती-पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर

पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर
पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर

औरंगाबाद - aurangabad

कोरोना (corona) काळात देशात लॉकडाऊन (Lockdown) लावला नसता तर लोकांना द्यायला पॅरासिटामोल (Paracetamol) गोळीदेखील शिल्लक राहिली नसती. इतकी भयंकर परिस्थिती देशात निर्माण झाली असती, अशी स्फोटक माहिती मराठवाड्याचे भूमिपुत्र तथा इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च संस्थेच्या (Institute of Indian Council of Medical Research) साथरोग आणि संसर्गजन्य रोग विभागाचे सेवानिवृत्त प्रमुख पद्मश्री डॉ.रमण गंगाखेडकर यांनी दिली.

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त ज्ञानयज्ञ फाऊंडेशनच्या वतीने शहरातील वंदे मातरम्‌ सभागृहात आयोजित पद्य फेस्टिव्हलमध्ये आज डॉ. वीणा पानट, डॉ. जयश्री मोरे आणि रचना रांगणेकर यांनी पद्मश्री डॉ. गंगाखेडकर यांची मुलाखत घेतली. त्यावेळी डॉ. गंगाखेडकर यांनी कोरोनाच्या भयानकतेवर भाष्य केले.

लॉकडाऊन लावणे गरजचेच होते कोरोनाकाळातील देशाच्या कामगिरीबाबत डॉ. गंगाखेडकर म्हणाले की, देशाने कोरोना काळात मोठी खबरदारी घेत मोहिमा राबविल्या. इतर देशांमध्ये वेगाने होणार्‍या कोरोनाच्या फैलावानंतर प्रचंड लोकसंख्या असलेल्या या देशात लॉकडाऊन लावणे गरजेचेच होते, जर लॉकडाऊन लावले नसते तर आपल्या देशातील लोकांना पॅरासिटामोल गोळी देखील द्यायला शिल्लक राहिली नसती, इतकी भयंकर परिस्थिती निर्माण आमच्या काळात अनेक नवनवीन साथरोग येत होते त्यामुळे त्याबद्दल संशोधन करायला मला आवडत होते. पैसे कमावण्यापेक्षा नवनवीन आजारांवर संशोधन करणे अधिक आवडत असल्याचे सांगितले.

मला आधी वैद्यकीय क्षेत्रात फारसा रस नव्हता. मात्र हळूहळू रस वाढत गेला आणि त्यानंतर मी यातच करिअर करण्याचे ठरवले. सन १९८६-८७ च्या काळात जेव्हा एचआयव्ही आणि एड्स यासारखे रोग आले तेव्हा याच्या कोणत्याही औषधी बाजारपेठेत नव्हत्या, मात्र मला अशा रुग्णांचे उपचार करायला आवडत असे आणि मी ते करायला जात होतो. त्यामुळे मी त्या रुग्णांची सेवा करायला जात होतो, असेही ते म्हणाले. २०३० पर्यंत हा आजार हद्दपार झाला पाहिजे, असे उद्दिष्ट निर्धारित करून वाटचाल चालू आहे, असेही डॉ. गंगाखेडकर यांनी सांगितले. 

लसीकरणाचा अभिमान  

लसीकरणामुळे देखील आपल्या देशाची मान उंचावली आहे, असे डॉ. गंगाखेडकर म्हणाले. सध्या लसीकरणाच्या बाबतीत मतमतांतरे आहेत. कोरोनाने मृत्यू पावलेल्या रुग्णांचे पोस्टमार्टेम झाले नाही, याबद्दल विचारलेल्या प्रश्‍नावर क्रिकेटपटू धोनीचा नामोल्लेख करत डॉ. गंगाखेडकर म्हणाले, क्रिकेट मॅच संपल्यानंतर भाष्य केल्यासारखा हा प्रकार आहे. कारण त्यावेळची परिस्थिती कठीण होती, पोस्टमार्टम करण्यास बंदी नव्हती. लसीकरणाबाबत सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात अफवा पसरवण्यात आल्या, याउलट सत्य परिस्थिती वेगळीच होती त्यामुळे काहीसा संभ्रम लोकांमध्ये निर्माण झाल्याचे ते म्हणाले. आपली आणि कुटुंबाच्या काळजीसाठी बूस्टर डोस घेणे आणि मास्क वापरणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com