दोन्ही डोस घेतले नसेल तर पगारही नाही

पोलीस, राखीव दलाला नवा नियम
दोन्ही डोस घेतले नसेल तर पगारही नाही

औरंगाबाद- वेळोवेळी आवाहन करुन देखील अनेक जण कोरोना लस घेण्यासाठी टाळाटाळ करत आहे. त्यामुळे औरंगाबाद शहर पोलिस दलासह राज्य राखीव दलाच्या सातारा बटालियनमधील ज्या पोलिस अधिकारी अथवा कर्मचा-यांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले नसतील त्यांना नोव्हेंबर महिन्याचा पगार दिला जाणार नसल्याचे जाहीर करण्यात आले आहे. तसेच १७ नोव्हेंबरपर्यंत लसीकरणाचे प्रमाणपत्र सादर केले नाही तर त्याला संबंधीत पोलिस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी जबाबदार राहणार आहे.

एन्ट्री पॉइंटवरील अँटीजेन बंद

महापालिकेतर्फे मागील दीड वर्षांपासून सहा एन्ट्री पॉइंट चिकलठाणा, कॅम्ब्रिज स्कूल चौक, हर्सूल टी पॉईंट, कांचनवाडी, झाल्टा फाटा, नगर नाका येथे प्रवाशांची कोरोना चाचणी केली जात होती. मात्र, प्रवाशांमधून होणारा विरोध, चालकांसोबतचे होणारे वाद लक्षात घेता, महापालिकेने या सहा एन्ट्री पॉइंटवरील चाचण्या बंद केल्या आहेत.

मात्र विमानतळ, बिबी-का-मकबरा, शासकीय वैद्यकीय महाविद्याल, प्रझोन मॉल, डिमार्ट, किलेअर्क कोविड सेंटर, पदमपुरा कोविड सेंटर, एमजीएम क्रिडा संकुल, मेल्ट्रॉन कोविड सेंटर, राज क्लॉथ, सिद्धार्थ उद्यान, रेल्वेस्टेशन, सिडको बस स्थानक, रिलायन्स मॉलवर चाचण्या सुरूच राहणार.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com