Saturday, April 27, 2024
HomeUncategorized'इंस्टाग्राम'वरील प्रेमापोटी पतीचा घेतला जीव!

‘इंस्टाग्राम’वरील प्रेमापोटी पतीचा घेतला जीव!

औरंगाबाद – aurangabad

इंस्टाग्रामवर (Instagram) सूत जुळलेल्या पत्नीने प्रेम संबंधात अडथळा ठरणाऱ्या पतीची प्रियकराच्या मदतीने हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तीन दिवसांपूर्वीच पैठण (Paithan) तालुक्यातील हर्षी शिवारात मृतदेह अर्धवट जळालेल्या अवस्थेत मिळून आला होता. पोलिसांनी (police) मयताच्या जवळ मिळालेल्या (Saree Center) साडी सेंटरची कॅरीबॅग आणि पाण्याच्या बाटलीवरून मयताची ओळख पटवून मारेकऱ्यांपर्यंत पोहचून त्यांना बेड्या ठोकल्या.

- Advertisement -

देविदास रामभाऊ जाधव (४५, रा.वरुड रोड, शेवगाव, जि. अहमदनगर) असे हत्या केलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी जाधव यांची दुसरी पत्नी सुरेखा तिचा प्रियकर आशिष विजय राऊत ( २६,रा. सावळी. जि.यवमाळ) आणि वाहनचालक संगीत शामराव देवकते (२५, रा.सावळी जि.यवमाळ) या तिघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांसह पाचोड पोलिसांनी नागपूर येथून शनिवारी दि.२१ मे रोजी पहाटे अटक करून पाचोड पोलिसांच्या ताब्यात दिले, अशी माहिती पोलीस अधीक्षक मनीष कलबानीया यांनी दिली. पाचोड-पैठण रस्तापासून १०० मिटर अंतरावरील थेरगाव-हर्षी परिसरातील गाढेकर व उबाळे वस्तीवर जाणार्‍या शीब रस्ताच्या कडेला नालीत एका व्यक्तीचा मृतदेह ब्लँकेट गुंडाळून जाळून फेकल्याचे समोर आले होते.

यावेळीच हा घातपात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. स्थानिक गुन्हे शाखेसह पाचोड पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. मयताच्या जवळ मिळालेल्या साडी सेंटरच्या कीबॅग आणि पाण्याच्या बाटलीवर शेवगाव, जि. नगरचा उल्लेख होता. त्यामुळे पोलिसांनी शेवगावचा परिसर पिंजून काढला. गोपनीय बातमीदार आणि स्थानिक लोकांच्या चौकशीत मयत हा इलेक्ट्रिशियन देविदास जाधव असल्याचे निष्पन्न झाले.

पहिली सोडून गेली, दुसरीने घात केला

जाधव यांचे पहिले लग्न झाले असून पहिल्या पत्नीकडून त्यांना दोन मुली देखील आहेत. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात वाद झाला आणि पहिली पत्नी जाधव यांना सोडून गेली. त्यानंतर त्यांनी काही दिवसांनी दुसरी पत्नी सुरेखासोबत लग्न केले. नंतर दोघेही बरेच दिवस चांगले राहिले. मात्र, नंतर सुरेखाचे दीड वर्षापूर्वी इंस्टाग्रामवर यवतमळ जिल्ह्यातील आशिष राऊत यांच्याशी ओळख झाली. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यामुळे घरात सतत वाद सुरु होता. त्यात जाधव हा सुरेखाला मारहाण करायचा. हे सर्व सुरेखा तिचा प्रियकर आशिष याला सांगायची.

झोपेतच डोक्यात टाकला रॉड

सुरेखाचा प्रियकर आशिष व तिने जाधव यांना पतीला संपवायचा निश्चय केला. जाधव घरात झोपलेले असताना पत्नी सुरेखाने प्रियकर आशिषला बोलवून घेतले. आशिष हा त्याचा कार (एमएच-१२-जीएफ-१५२७) चालक मित्र संगीत देवकते याला सोबत घेऊन शेवगावला आला होता. दोघांनी जाधव हे झोपीत असतानाच पत्नी सुरेखा यांनी लोखंडी रॉडने जाधव यांचा खून केला. त्यानंतर जाधव यांचा मृतदेह संगीत याने आणलेल्या कारमध्ये टाकून पाचोड हद्दीतील हर्षी शिवारात नेला.

- Advertisment -

ताज्या बातम्या