Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedरेशन कार्डवर 'असा' करा मोबाईल नंबर अपडेट

रेशन कार्डवर ‘असा’ करा मोबाईल नंबर अपडेट

मुंबई | Mumbai

रेशन कार्ड (Ration card) हे महत्त्वाचे दस्तऐवज (Document) आहे. ज्यातून तुम्ही सरकारकडून (Government) मोफत रेशन (Free Ration) मिळवू शकतात. जर तुमचा मोबाईल नंबर (Mobile Number) या कार्डवर चुकीच्या पद्धतीने टाकला गेला असेल अथवा नंबर बदलला असेल, तसेच कार्ड अपडेट (Card update) नसल्यास ती एक समस्या असू शकते. त्यामुळे तुम्ही तत्काळ रेशन कार्डवर मोबाईल क्रमांक अपडेट करून घ्यायला हवा…

- Advertisement -

रेशन कार्डमध्ये मोबाईल नंबर अपडेट करणे अगदी सोपे आहे. जर तुमच्या रेशनकार्डमध्ये जुना मोबाईल क्रमांक टाकला असेल तर तुम्हाला रेशनशी संबंधित अपडेट मिळू शकणार नाहीत. उत्पन्नाच्या दिवशी अनेक महत्त्वाचे अपडेट्स विभागाकडून कार्डधारकांना मेसेजद्वारे पाठवले जातात.

Visual Story : अबब! ‘पुष्पा’च्या आयटम साँगसाठी समांथाने आकारले पाच कोटी

असा करा मोबाईल नंबर अपडेट

  • प्रथम https://nfs.delhi.gov.in/Citizen/UpdateMobileNumber.aspx या वेबसाईट वर जा.

  • नंतर तुमच्या समोर एक वेबपेज उघडेल. या पेजवर Update Your Registered Mobile Number असा पर्याय दिसेल.

  • आता खाली दिलेल्या पर्यायात तुमची माहिती भरा.

  • पहिल्या पर्यायात Aadhaar Number of Head of Household/NFS ID टाका.

  • दुसऱ्या पर्यायात Ration Card Number टाका.

  • तिसर्‍या पर्यायात घरप्रमुखाचे (Name of Head of Household) नाव टाका.

  • शेवटच्या पर्यायात तुमचा नवीन मोबाईल नंबर टाका आणि सेव्ह बटनावर क्लिक करा.

  • यानंतर तुमचा मोबाईल नंबर अपडेट केला जाईल.

Photo Gallery : आता नाशिकमध्ये घेता येईल केदारनाथचे दर्शन

दरम्यान, 1 जून 2020 पासून देशातील 20 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये रेशन कार्ड पोर्टेबिलिटी सेवा ‘वन नेशन-वन रेशन कार्ड’ (One Nation-One Ration Card) सुरू झाली आहे. या योजनेअंतर्गत तुम्ही कोणत्याही राज्यात राहून रेशन खरेदी करू शकता. ही योजना आंध्र प्रदेश, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, हरियाणा, राजस्थान, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, गोवा, झारखंड, त्रिपुरा, बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि दमण-दीवमध्ये आधीच लागू करण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या