दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे तरी कसे?  

शालेय प्रशासनास पडला गहन प्रश्न  
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे तरी कसे?  

औरंगाबाद - Aurangabad

वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दहावी वर्गाच्या विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्यांना यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे उत्तीर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परंतु, कोणत्या निकषांच्या आधारावर मूल्यमापन करावे, असा प्रश्न शालेय प्रशासनास पडला आहे.

Title Name
रेल्वे तिकिटांचा काळाबाजार करणारे दोघे जेरबंद 
दहावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करावे तरी कसे?  

याबाबत मुख्याध्यापक हे शिक्षण विभागाच्या पुढील आदेशाची प्रतीक्षा करीत आहेत, अशी माहिती जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे अध्यक्ष मनोहर सुरगुडे पाटील यांनी दिली.

दहावीच्या विद्यार्थ्यांना आता उत्तीर्ण कशा प्रकारे करायचे, यावर राज्य सरकार आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ यांच्यात विचारमंथन करीत आहे. यावर निर्णय घेण्यासाठी तज्ज्ञांची समिती गठीत केली आहे. ही तज्ज्ञांची समिती नेमका काय निर्णय घेणार, याकडे राज्यातील विद्यार्थ्यांचे आणि मुख्याध्यापकांचे लक्ष लागले आहे.

शाळेकडून विद्यार्थ्यांना तोंडी आणि प्रात्यक्षिकाचे देण्यात येणारे 20 गुण मिळणार आहेच. मात्र, विद्यार्थ्यांची जी लेखी 80 गुणांची परीक्षा होत होती. हे 80 गुण कोणत्या निकषांच्या आधारे द्यायचे आहे, यासंदर्भात अद्याप निर्णय होणे बाकी आहे. त्यामुळे तज्ज्ञांचय समितीकडे आम्ही बारीक लक्ष ठेऊन आहोत, अशी माहिती मुख्याध्यापक संघटनेचे मराठावाडा अध्यक्ष युनूस पटेल यांनी दिली. मूल्यमापन पद्धतीबाबत तज्ज्ञांच्या समितीबरोबरच मुख्याध्यापक संघटनेशी देखील शिक्षण मंञी वर्षा गायकवाड चर्चा करणार आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रवेशावेळी टेस्ट होणार?

दहावी विद्यार्थ्यांना आता अंतर्गत मूल्यमापन आधारे गुण देऊन उत्तीर्ण करण्यात येणार आहे. मात्र त्यानंतर अकरावी किंवा इतर ठिकाणी प्रवेशावेळी विद्यार्थ्यींची टेस्ट घेऊन त्यांना प्रवेश देण्याचा देखील विचार सुरू आहे, असे मुख्याध्यापक संघनेचे जिल्हाध्यक्ष मनोहर सुरगुडे पाटील यांनी सांगितले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com