औरंगाबादचा सन्मान ; 'फ्लाईंग अप्सरा' काष्ठशिल्पाची निवड

औरंगाबादचा सन्मान  ; 'फ्लाईंग अप्सरा' काष्ठशिल्पाची निवड

औरंगाबाद - aurangabad

(Government of Maharashtra) महाराष्ट्र शासनाच्या कला संचालनालयाच्या वतीने आयोजित ६१ व्या राज्य कला प्रदर्शनासाठी औरंगाबादचे (Artist Ashish Gokhale) कलावंत आशिष गोखले यांनी काष्ठशिल्पात साकारलेल्या "फ्लाईंग अप्सरा'या कलाकृतीची निवड झाली आहे. शहरातून कलाकार विभागात कलाकृतीची निवड झालेले ते एकमेव कलावंत आहेत. (mumbai) मुंबईतील सर जे. जे. कला महाविद्यालयात २५ फेब्रुवारी ते २ मार्चदरम्यान हे प्रदर्शन सर्वांसाठी खुले राहेल.

कला संचालनालयाच्या वतीने दरवर्षी कला प्रदर्शन आयोजित केले जाते. यंदा प्रदर्शनासाठी नोव्हंबरमध्ये जाहिरात आली तर प्रवेशिकेसोबत दोन कलाकृतींचे छायाचित्रे प्रवेशिका पाठवायचे होते. आशिष गोखले यांनी (Ajanta Caves) अजिंठ्याच्या १७ क्रमांकाच्या लेणीतील अजरामर चित्रकृती "फ्लाईंग अप्सरा'च्या काष्ठशिल्पाची प्रवेशिका पाठवली. त्याची महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन (कलाकार विभाग)-२०२१-२२ साठी निवड झाली.

गोखले यांनी दीड फूट रूंद, २ फूट उंच आणि ६ इंच जाडीचे बर्मा टीक लाकूड कोरून ही कलाकृती तयार करण्यात आली आहे. मूळ छायाचित्रात तथागत गौतम बुद्ध यांना नमन करण्यासाठी स्वर्गातून देवी-देवता आणि अप्सरा पृथ्वीवर येतात. गोखले यांनी त्यातील "फ्लाईंग अप्सरा' त्यांनी काष्ठशिल्पातून साकारली. संचालनालयातर्फे प्रकाशीत करण्यात आलेल्या कॅटलॉगमध्येही त्यांच्या कलाकृतीचा समावेश झाला आहे. दरम्यान, २४ रोजी प्रदर्शनाचे उद्घाटन होऊन ते २ मार्च पर्यंत सकाळी ११ ते सायंकाळी ७ दरम्यान खुले राहेल. अधिकाधिक कलाप्रेमींनी प्रदर्शनाला भेट द्यावी, असे गोखले म्हणाले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com