होंडाची अमेझ बाजारात दाखल...

होंडाची अमेझ बाजारात दाखल...

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

होंडा कंपनीने (Honda) आपल्या सर्वात प्रसिद्ध असणारी सुधारीत अमेझ २०२१ (amaze) ही नवी कार बाजारात दाखल केली आहे. नाशिक येथील वृषभ होंडा (Rushabh Honda) या शोरूममध्ये गाडीचे अनावरण करण्यात आले...

यावेळी क्रिश ऑटोव्हीलचे संचालक हेमंत चोपडा, एसबीआयचे विभागीय व्यवस्थापक शिताक्षी सिंग, विष्णू वत्स, अमोल चावरे जितेंद्र पाटील, अमोल शिंदे, समीर शेख, तसेच शरद सूर्यवंशी उपस्थित होते.

वैशिष्ट्ये
नवीन अमेझच्या एक्सटेरियर बदलांमध्ये फाईन क्रोम मोल्डींग लाईन्ससह गॉडस सॉलिड विंग फेस फ्रंट ग्रीलचा समावेश आहे. इंटीग्रेटेड सिग्नेचर डीआरएलएससह अत्याधुनिक आणि स्टायलिश एलइडी प्रोजेक्टर हेड लॅम्प, स्लीक क्रोम गार्निशसह नवीन अत्याधुनिक एलइडी फ्रंट फॉग लॅप्स आणि रिडिझाईन फ्रंट बंपर लोवर बील. फ्रंट फॉग लॅम्पसह नवीन डिझाइन केलेले हेडलॅम्प.

युनिक सिग्नेचर रेड ल्युमिनसंस, प्रीमियम क्रोम गार्निश आणि रिफ्लेक्टरसह रिडिझाइन्ड रियर बंपर यांसह नवीन प्रीमियम सी आकाराचे एलइडी रियर कॉम्बीनेशन लॅप्स रिफ्रेश मॉडेलमध्ये न्यु डायमंड-कट टू-टोन मल्टी-स्पोक आर-१५ अलॉय व्हील्स आणि टच सेंसर बेस स्मार्ट एंट्री सिस्टीमसह नवीन क्रोम हँडल्स आदी या कारची वैशिष्ट्ये आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com