...यापुढे फोटो काढताना दक्ष राहीन- अनिल देशमुख 

'गुन्हेगारां'सोबत गृहमंत्री देशमुखांचा फोटो व्हायरल 
...यापुढे फोटो काढताना दक्ष राहीन- अनिल देशमुख 
Amit Mendhe

औरंगाबाद - Aurangabad

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुखांचा गुन्हेगारांसोबतचा फोटो व्हायरल झाल्यानंतर विरोधकांनी त्यांना कोंडीत पकडले आहे, त्यानंतर अनिल देशमुखांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. मी औरंगाबादला दौऱ्यावर होतो. दौऱ्यावर असताना हजारो लोक भेटण्यासाठी येत असतात, निवेदन देत असतात, अशावेळी कोणती व्यक्ती, त्याचा काय व्यवसाय याची माहिती नसते. पण यापुढे अवश्य दक्ष राहीन, असे गृहमंत्र्यांनी म्हटले आहेत.

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख सध्या एका फोटोमुळं चांगलेच चर्चेत आले आहेत. या फोटोच गृहमंत्र्यांच्या शेजारी उभ्या असलेल्या तिघांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. अनिल देशमुख औरंगाबाद दौऱ्यावर असतानाचा हा फोटो आहे. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर गृहमंत्र्यांना विरोधकांनी घेरले आहे.

गृहमंत्र्यांसोबत व्हायरल होणाऱ्या फोटोतील दोन जण एमआयएमचे माजी नगरसेवक आहेत. तर, एकाची एमआयएमने पक्षातून हकालपट्टी केली असून तिघांवर शहरातील वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. कलीम कुरेशी, सय्यद मतीन आणि जफर बिल्डर अशी त्यांची नावे आहेत. सय्यद मतीन यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असून तो जेलमध्ये होता तर, कलीम कुरेशीची ओळख शहरात गुटखा किंग म्हणून आहे. जफर बिल्डरवर ट्रक चोरुन त्याचे सुटे भाग करून विल्हेवाट लावण्याचा गुन्हा त्याच्यावर दाखल आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com