हिट अँड रन: नुकसान भरपाईच्या रकमेत ८ पटीने वाढ

एक एप्रिलपासून नियम लागू होणार
हिट अँड रन: नुकसान भरपाईच्या रकमेत ८ पटीने वाढ

औरंगाबाद - aurangabad

(Central Government) केंद्र सरकारने हिट अँड रन (Hit and run) प्रकरणातील पीडितेच्या नातेवाईकांना दिल्या जाणाऱ्या भरपाईच्या रकमेत आठ पट वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. यासोबतच हिट अँड रनमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना १ एप्रिलपासून २ लाख रुपयांची भरपाई दिली जाणार आहे.

रस्ते वाहतूक (Road traffic) आणि महामार्ग मंत्रालयाच्या (Ministry of Highways) अधिसूचनेनुसार, अशा घटनांमध्ये गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या नुकसानभरपाईच्या रकमेतही चार पटीने वाढ करण्यात आली आहे. आता १ एप्रिलपासून भरपाईची रक्कम ५०,००० रुपये होणार आहे.

२५ फेब्रुवारी रोजी जारी करण्यात आलेल्या या अधिसूचनेत मंत्रालयाने सांगितले की, या योजनेचे नाव हिट अँड रन मोटर अपघातातील पीडितांना भरपाई योजना, 2022 असे असेल आणि १ एप्रिल पासून लागू होईल. मंत्रालयाने २ ऑगस्ट २०२१ रोजी मसुदा योजना अधिसूचित केली होती. हिट अँड रन अपघातात बळी पडलेल्यांसाठी या भरपाई योजनेचा उद्देश नुकसान भरपाईची रक्कम वाढवणे आहे. ही योजना नुकसानभरपाई योजना, १९८९ ची जागा घेईल, असे अधिकृत निवेदनात म्हटले आहे.

विशेष म्हणजे याआधी हिट अँड रन अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना सरकार केवळ २५ हजार रुपये भरपाई देत असे, तर अपघातातील मृतांना केवळ १२ हजार ५०० रुपये नुकसानभरपाई मिळत होती.

किती मिळणार नुकसानभरपाई?

मृत्यू झाल्यास

रस्ते अपघातात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना २ लाख रुपये दिले जाणार आहे. याआधी ही रक्कम २५ हजार रुपये इतकीच होती.

जखमी व्यक्तींना

जखमी झालेल्या व्यक्तीला देण्यात येणाऱ्या रक्कमे वाढ करण्यात आली असून आता जखमींना ५० हजार रुपये देण्यात येणार आहे. याआधी ही रक्कम १२५०० रुपये इतकी होती.

नियम १ एप्रिल २०२२ पासून लागू होणार

या नव्या योजनेचे नाव 'हिट ॲण्ड रन मोटर अपघात योजना पीडित नुकसानभरपाई २०२२' असे असणार आहे. ही योजना १ एप्रिल २०२२ पासून लागू करण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com