हिमायत बाग होणार जैवविविधता वारसा स्थळ

औरंगाबादकरांची इच्छा पूर्ण
हिमायत बाग होणार जैवविविधता वारसा स्थळ

औरंगाबाद - aurangabad

हिमायत बाग (Himayat Bagh) जैवविविधता वारसा स्थळ म्हणून तयार करण्याचा प्रस्ताव वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठा (Marathwada Agricultural University) अंतर्गत फळ संशोधन केंद्र औरंगाबाद यांनी महापालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीसमोर सादर केला होता. या अनुषंगाने स्मार्ट सिटी (Smart City) कार्यालया प्रशासक डॉ. अभिजीत चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली समितीची बैठक झाली. यावेळी हिमायत बाग परिसरास जैवविविधता पार्क म्हणून घोषित करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच हिमायत बाग परिसरातील अतिक्रमणे काढण्याचे आदेश देखील प्रशासकांनी दिले.

हिमायत बाग होणार जैवविविधता वारसा स्थळ
औरंगाबादमध्ये बांधकाम व्यावसायिकाची आत्महत्या

या बैठकीत हिमायत बाग परिसर जैवविविधता परिसर म्हणून घोषित करण्याचा प्रस्ताव मंजूर करून तो अंतिम मान्यता मिळावी यासाठी जैवविविधता बोर्ड नागपूर यांच्याकडे पाठवण्याच्या सूचना प्रशासकांनी दिल्या. संबंधित प्रस्ताव करताना हिमायत बाग येथे कृषी विद्यापीठाचे दैनंदिन कामे, तसेच संशोधन कार्यात अडथळा येणार नाही, याची दक्षता घेऊन प्रस्ताव पाठवावा, असेही प्रशासकांनी सूचित केले. हिमायत बाग परिसरातील अतिक्रमणांबाबत प्रशासनाने कारवाई करण्यासाठी पालिका प्रशासन सर्वोतोपरी सहकार्य करेल, असेही प्रशासकांनी बैठकीत सांगितले. डॉ. सलीम अली सरोवर परिसर सुद्धा जैवविविधता परिसर घोषित करण्याकरिता विभागाने तपशीलवार नियोजन करण्याच्या सूचना प्रशासकांनी केल्या. तसेच हिमायत बाग परिसरात शक्कर बावडीची डीसिलटिंग करण्यास काही हरकत नसावी, असेही ते म्हणाले.

या बैठकीला उपायुक्त अपर्णा थेटे, मुख्य उद्यान अधिकारी विजय पाटील, जैवविविधता समिती सदस्य आणि इतिहास तज्ज्ञ डॉ. शेख रमजान, परिक्षेत्र वन अधिकारी डी. बी. तौर, पक्षी मित्र डॉ. दिलीप यार्दी, वाल्मीचे डॉ. व्ही. ए. बोडखे, माहिती व जनसंपर्क अधिकारी तौसीफ अहमद आदींची उपस्थिती होती.

जैवविविधता समिती सदस्य व इतिहास तज्ज्ञ डॉ. शेख रमजान यांनी डॉ. सलीमअली सरोवराला जैवविविधता परिसर म्हणून घोषित करावे, अशी मागणी केली. याबाबत प्रशासकांनी हिमायत बाग भागालगत डॉ. सलीम अली सरोवरालादेखील जैवविविधता परिसर म्हणून घोषित करता येईल का, यासाठी तपशीलवार अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले. या अहवाल आधारे सलीम अली सरोवर जैवविविधता परिसर घोषित करण्याचा निर्णय घेण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com