Corona
Corona
अन्य

गेल्या २४ तासांत १७ हजार २९६ रुग्णांची सर्वात मोठी वाढ

देशात करोनाचा उद्रेक

Mayuri Kulkarni

दिल्ली : देशभरात मागील २४ तासांत कोविड-१९ चे १७,२९६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. तर ४०७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. या नव्या रुग्णासह भारतातील करोना बाधितांचा आकडा ४,९०,४०१ वर पोहचला आहे.

दरम्यान देशभरात करोनाचा कहर वाढतच असून यामुळे करोना व्हायरसचे संकट दाहक रुप धारण करु लागले आहे. सातत्याने वाढणारी रुग्णसंख्या आणि मृतांचा आकडा चिंतेत भर घालत आहे. वरील आकडेवारीनुसार १,८९,४६३अॅक्टीव्ह केसेस म्हणजेच या रुग्णांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर २,८५,६३७ रुग्ण कोरोना संसर्गातून पूर्णपणे रिकव्हर झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.

देशात एकूण १५३०१ रुग्णांचा कोरोनाच्या संसर्गामुळे बळी गेला आहे. अशी माहिती आरोग्य मंत्रालयातून देण्यात आली आहे.

देशातील महाराष्ट्र, तामिळनाडू, उत्तर प्रदेश, गुजरात येथे कोरोना बाधितांची संख्या अधिक असून मुंबई, दिल्ली मध्येही कोविड-१९ चा विळखा तीव्र आहे.

Deshdoot
www.deshdoot.com