Friday, April 26, 2024
HomeUncategorizedसोयगावला मुसळधार तर सावळदबारा मंडळात अतिवृष्टीची नोंद

सोयगावला मुसळधार तर सावळदबारा मंडळात अतिवृष्टीची नोंद

सोयगाव – प्रतिनिधी Soygaon

सोयगावसह तालुक्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली यामध्ये सोयगाव मंडळात मुसळधार तर सावळदबारा मंडळात ७५ मी.मी अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

- Advertisement -

बनोटी पाठोपाठ पावसाने सोयगाव आणि सावळदबारा मंडळात धुमाकूळ घातला आहे.यामध्ये सावळदबारा मंडळातील बारा गावात अतिवृष्टी व वादळी वाऱ्याने कपाशी पिके आडवे पडून सोयाबीनच्या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. सोयगाव मंडळातील गलवाडा, रावेरी, कंकराळा, सोयगाव आदी भागात मुसळधार पावूस कोसळला यामध्ये वादळी वाऱ्याचा मोठा तडाखा असल्याने सोयगाव मंडळात कपाशी पिकांवरील नवीन लागलेला कापूस भिजला आहे. काही भागात कपाशी पिकांचे ओझ्याने वाकून कंबरडे मोडले आहे. सावळदबारा मंडळातील बारा गावात सोयाबीन पिकांचे शंभर टक्के नुकसान झाल्याचे बाधित शेतकऱ्यांनी सांगितले दरम्यान रविवार सुटीचा दिवस असल्याने पंचनाम्यांच्या प्रक्रियेत खोडा निर्माण झालेला आहे. सावळदबारा मंडळात अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे.

जरंडीला विजांच्या कडकडाट

जरंडी परिसरात मुसळधार पावसात विजांचा कडकडाट जोरदार होता तब्बल वीस मिनिटे विजांचा लक्ख प्रकाश जमिनीवर असल्याचे जरंडीकरांनी अनुभवल्याने गावात या विजांच्या चमत्काराने घबराट पसरली होती. वादळी वाऱ्याचे प्रमाण जोरात असल्याने जरंडी परिसरात कपाशी पिके आडवी पडली आहे.

सोयगाव आणि सावळदबारा मंडळात मुसळधार पावूस झाल्याच्या नोंदी आहे. यामध्ये सोयगाव मंडळात ५० मी.मी तर सावळदबारा मंडळात ७५ मी.मी इतकी पावसाची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान क्षेत्राची माहिती संकलित करून पंचनाम्यांचे आदेश देण्यात येतील.

प्रविण पांडे, तहसीलदार सोयगाव

- Advertisment -

ताज्या बातम्या