४८ तासात जोरदार पाऊस

कोकण आणि मध्य महाराष्ट्रासाठी हवामान विभागाचा अंदाज
४८ तासात जोरदार पाऊस
rain in maharashtra

पुणे (प्रतिनिधी) Pune - कोकण आणि मध्य महाराष्ट्र या भागात पुढील ४८ तासात जोरदार पाऊस पडणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापासूनच मुंबईतील पावसानं नागरिकांना अक्षरशः झोडपून काढलं आहे. आता मुंबईसह कोकणातही जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवमान विभागाने व्यक्त केला आहे.

राज्यात आठवडाभर दमदार झालेला पाऊस आता धोक्याची पातळी ओलांडतो आहे. या धर्तीवर हवामान विभागाकडून ठाणे, रायगड आणि पालघर जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नाशिक आणि पुणे जिल्ह्यांत घाटमाथ्याच्या भागातही जोरदार पाऊस पडणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. सॅटेलाईट छायाचित्रावरून पश्चिम किनारपट्टीवर ढगांची दाटी झालेली स्पष्ट दिसते आहे. त्यामुळे पूर्ण किनारपट्टी भागात पुढच्या दोन दिवसात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

दरम्यान मुंबई आठवडाभरात जोरदार पाऊस झाला. ठाणे, रायगड, कोकणसह पश्चिम महाराष्ट्रतही पावसानं थैमान घातलं. मात्र मागील दोन दिवसांपासून पावसानं विश्रांती घेतल्यानंतर राज्यातील पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com