औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी

विजांच्या कडकडाटाने उडाली झोप
औरंगाबादमध्ये पुन्हा एकदा ढगफुटी

औरंगाबाद - Aurangabad

औरंगाबाद शहराला आज पहाटे पुन्हा एकदा (Heavy rain) मुसळधार पाऊस अन् वीजांच्या कडकडाटाला सुरुवात होऊन पुन्हा एकदा ढगफुटी सदृश्य पावसामुळे हाहाकार उडाला.

शहरातून वाहणाऱ्या खाम सुखना नदीला मोठा पूर आला असून, नारेगाव, ब्रिजवाडी, चिकलाठाणा, चौधरी कॉलनी, नूर कॉलनी या भागाला पुराचा मोठा फटका बसला.

पहाटे 3.25 सुमारास शहरात हलक्या पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर 3.38 दरम्यान मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर आभाळात एका-मागून एक विजा कडाडल्याचा आवाज येऊ लागला.

पहाटे 3.38 ला सुरु झालेला पाऊस 4.03 वाजेपर्यंत अखंड बरसत होता. या पंचवीस मिनिटात सरासरी 118 मिली प्रति तास या वेगाने पावसाच्या सरी कोसळत होत्या. एमजीएम जेएनईसी वेधशाळेत या पंचवीस मिनीटात 51. 2 मिमी पावसाची तर 5.35 पर्यंतच्या 78.2 मिमी पावसाची नोंद झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com