वादळी पावसाचा आंब्यांना फटका!

यंदा दोन महिने उशिराने आगमन
वादळी पावसाचा आंब्यांना फटका!

औरंगाबाद - aurangabad

यंदा ऐन बहरात अवकाळी पावसाचा तडाखा व वादळी वाऱ्यामुळे यंदा (Mango) आंब्याचा हंगाम दीड ते दोन महिने उशिराने सुरू झाला असल्याने आंब्याची कमतरता जाणवत आहे. त्यामुळे आंब्याची चव चाखण्यासाठी दुप्पट दाम मोजावे लागत आहे. नेहमीपेक्षा दुप्पट भाव असल्याने यंदा फळांचा राजा असलेल्या आंब्याचा गोडवा महागला आहे. मागील वर्षी पाऊस (rain) चांगला झाल्याने यंदा आंब्याचा मोसम चांगला होता.

दरवर्षी फेब्रुवारी महिन्यापासून बाजारात आंब्याची आवक सुरू होते आणि ती जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत कायम राहते. त्यामुळे आंब्याच्या किंमती ६० रुपयापासून तर १२० रुपयांपर्यंत मिळत होते. मात्र तीच किंमत यंदा १२० रुपये पासून ३०० रुपये पर्यंत गेली आहे. हापूस, लालबाग, केशर, आंब्याची बदाम, दशहारी, तोतापरी, असे बरेचसे जातीच्या आंब्यांना वादळ व पावसामुळे फटका बसला असून यंदा दोन महिने उशिराने आंब्याचे आगमन झाले आहे.

फळ किक्रेत्यांशी संवाद साधला असता फेब्रुवारी महिन्यापासून अशा विविध आंब्याच्या जाती बाजारात येणारे आंबे दीड ते दोन महिने उशिराने बाजारात विक्रीसाठी आलेले आहेत. मागील पाच ते सहा वर्षांत आंब्याचा इतक्या मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवला नसल्याने ग्राहकांना आंब्याची चव घेण्यासाठी अजून काही दिवस तरी जास्त पैसे मोजावे लागणार आहेत. अक्षय तृतियेला पुरणपोळी व आंब्याच्या रसाचा मान असल्याने यंदाची अक्षय तृतीया देखील अधिकचे पैसे मोजून नागरिकांना साजरी करावी लागणार असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येत आहे.

असे आहेत आंब्याचे भाव

हापूस १ हजार २०० ते १ हजार ८०० रुपये पेटी

लालबाग २०० रुपये किलो,

केशर ३०० रुपये किलो,

बदाम १५० रुपये किलो,

दशहरी १८० रुपये किलो.

Related Stories

No stories found.