राज्यात या दिवशी होणार मुसळधार पाऊस ; सावधानतेचा इशारा

हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा अंदाज
राज्यात या दिवशी होणार मुसळधार पाऊस ; सावधानतेचा इशारा

औरंगाबाद - aurangabad

5 सप्टेंबरपासून ते 8 सप्टेंबर पर्यंत राज्यातील (maharastra) बऱ्याच भागात मुसळधार पाऊस (heavy rain) होईल. या पावसावर नाले तुडूंब भरून वाहतील असा पाऊस राहील हा पाऊस कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भ या सर्व भागात राहील.

विदर्भातील नागपूर, वर्धा, अमरावती, अकोला, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम मराठवाड्यातील औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, बीड, हिंगोली, परभणी, नांदेड मध्य महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव व कोकणातील मुंबई या जिल्हात 7 सप्टेंबरपर्यंत भाग बदलत पाऊस होईल असा अंदाज हवामान अभ्यासक पंजाबराव डख याच्याकडून वर्तवण्यात आला आहे.

राज्यात गणरायाच्या आगमनाच्या दिवशी 31 तारखेला म्हणजेच महाराष्ट्रात पावसाला सुरुवात झाली. राज्यातील अनेक भागात 31ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी पाऊस झाला. मात्र काही भाग कोरडेच होते, त्यामुळे अजूनदेखील राज्यात अनेक भागात शेतकरी बांधव पावसाची अतिशय आतुरतेने वाट पाहत आहे.

हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाजानुसार 5 सप्टेंबर पासून ते 18 सप्टेंबर पर्यंत राज्यात सर्वत्र पावसाची शक्यता असल्याचे सांगितले आहे. मात्र सदर कालावधीत पाऊस हा भाग बदलत कोसळणार असल्याचे सुद्धा पंजाबराव यांनी नमूद केले आहे. तसेच शेतकरी बांधवांनी चार तारखेपर्यंत आपली शेतीची कामे करून घ्यावीत तसेच शेतमाल व आपल्या पशुधनासाठी योग्य ती व्यवस्था करून घ्यावी कारण 8, 9 आणि 10 सप्टेंबर रोजी राज्यात अनेक ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे. जेणेकरून अतिवृष्टीच्या काळात त्यांना नुकसान सहन करावे लागणार नाही.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com