Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे

पुढील तीन दिवस मुसळधार पावसाचे

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

येणारे तीन दिवस मराठवाड्यातील (Marathwada) अनेक जिल्ह्यांना मुसळधार (heavy rain) ते मध्यम पावसाचा तडाखा बसणार आहे. शिवाय अनेक ठिकाणी विजा पडण्याच्या शक्यतेने शेतकऱ्यांनी स्वतःसह आपल्या जनावरांना सुरक्षित ठिकाणी ठेवण्याच्या सूचना देखील करण्यात आल्या आहेत. 

- Advertisement -

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

मराठवाड्यात ऐन उन्हाळ्यात अनेक जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून अवकाळी पावसाचे वातावरण पाहायला मिळत असून काही ठिकाणी जोरदार पावसासह गारपीट झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. अशात मराठवाड्यात आजपासून पुन्हा मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. तर आजपासून ३० एप्रिलपर्यंत मराठवाड्यातील वेगवेगळ्या भागात वादळी वारा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विशेष म्हणजे काही भागात गारपिटीची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे.

शिरपूरच्या डीबी पथकाने रोखली गुटखा तस्करी

असा आहे अंदाज –
२७ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

२८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी, हिंगोली, नांदेड लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

२९ एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात, तर ३० एप्रिल रोजी नांदेड, हिंगोली, परभणी आणि लातूर जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वारा, मेघगर्जना होईल. दरम्यान, विजांचा कडकडाट होऊन पाऊस पडेल.

‘या’ जिल्ह्यात सावधानतेचा इशारा
२७ एप्रिल रोजी परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांत.
२८ एप्रिल रोजी छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपिटीची शक्यता आहे, असा अंदाज पंजाबराव डख आणि परभणीच्या ‘वनामकृ’ विद्यापीठाच्या ग्रामीण कृषी हवामान सेवा विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

गुरुपुष्यामृत योग ; शेगावात भाविकांची गर्दी

- Advertisment -

ताज्या बातम्या