औरंगाबाद शहरावर काही वेळासाठी ढगफुटी!

अनेक ठिकाणी झाडे जमीनदोस्त
औरंगाबाद शहरावर काही वेळासाठी ढगफुटी!

औरंगाबाद- (Aurangabad)

गेल्या दोन दिवसांपूर्वी बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या गुलाब चक्रीवादळामुळे (Gulab Hurricane) काल व आज मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने झोडपून काढले. सकाळच्या पावसात अनेक भागात झाडे पडल्याचे तर काही ठिकाणी झाडांच्या फांद्या तुटून पडल्या.

लाब चक्रीवादळामुळे आज औरंगाबाद शहरावर पहाटे १२:१० ला सुरू झालेल्या मुसळधार पावसाने सुरुवात झाली. पहाटे तीन दरम्यान पावसाने रौद्र रूप धारण केले त्यावेळेस एमजीएम जेएनईसी वेधशाळेत पावसाचा वेग ११०.७ मीमी प्रति तास मोजला गेला. यानंतर सकाळी १०:५१ ते ११:२१ या अर्ध्या तासाच्या कालावधीत ढगफुटीपेक्षा जास्त वेगाने पाऊस झाला. या तीस मिनीटाच्या काळात पाऊस पड़ण्याचा सरासरी वेग हा १०८.० मीमी प्रतितास एवढा नोंदला गेला.

या तीस मिनिटांच्या कालावधीत ५२.२ मी.मी पावसाची नोंद झाली. म्हणजेच औरंगाबाद शहरावर पुन्हा ढगफुटी पेक्षा वेगाच्या पावसाने झोडपून काढले (ताशी शंभर मी. मी. किंवा जास्त पाऊस झाल्यास ढगफुटी म्हटली जाते) पहाटे १२:१० ते सकाळी ११:१५ या सुमारे अकरा तासात औरंगाबाद शहरातील एमजीएम जेएनईसी वेधशाळेत ९८.३ तर एमजीएम गांधेली वेधशाळेत ७४.९ मीमी पावसाची नोंद झाली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com