विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळे पक्षपातीपणा!

आमदाराची खंडपीठात धाव
विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळे पक्षपातीपणा!

औरंगाबाद - aurangabad

नांदेड (Nanded) जिल्ह्यातील किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघातील (bjp) भाजपचे आमदार भीमराव केराम (MLA Bhimrao Keram) यांनी विकासकामांसह आदिवासींसाठींच्या विविध योजनांची शिफारस केलेल्या कामांना नामंजूर करत विधान परिषदेवरील सदस्य असलेल्या अमरनाथ राजूरकर यांनी सूचवलेली ६७ कामे मंजूर करण्यात आली. या नाराजीने आमदार केराम यांनी दाखल केलेल्या याचिकेच्या सुनावणी नंतर औरंगाबाद खंडपीठाचे (Aurangabad Bench) न्यायमूर्ती रवींद्र घुगे व न्यायमूर्ती अनिल पानसरे (Justice Anil Pansare) यांनी राज्य शासनासह आदिवासी विभाग, नांदेड जिल्हा परिषद भोकर विभागातील कार्यकारी अभियंत्यास नोटीस बजावली आहे.

आ.भीमराव केराम यांनी अँड. संजीव देशपांडे यांच्यामार्फत याचिका दाखल केली आहे. याचिकेनुसार आमदार केराम यांनी फेब्रुवारी २०२२ मध्ये आदिवासी विकासमंत्री के. सी. पाडवी यांना आदिवासी उपयोजनांमधून २६ कामे सूचवलेली होती. यासाठी एक शिफारसपत्र दिले होते. मंत्र्यांनी ते शिफारसपत्र पुढे पाठवले. कक्ष अधिकाऱ्यांनी नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना प्रशासनाकडे मान्यता देऊन प्रस्ताव पाठवावा, असे पत्राद्वारे कळवले होते. याच मतदारसंघातील कामांतून विधान परिषद सदस्य अमरनाथ राजूरकर यांनीही ३६ कोटी ५० लाखांची ६७ कामे सूचवली. आमदार केराम आणि आमदार राजूरकर यांच्या कामांचा विचार करा, असे नांदेड जिल्हा परिषदेला कळवण्यात आले होते. मात्र, आ. राजूरकर यांच्या कामांना मंजुरी देण्यात आली तर आ. केराम यांची सर्व कामे नामंजूर करण्यात आली.

विरोधी पक्षातील आमदार असल्यामुळे पक्षपातीपणा होत आहे, अशी नाराजी व्यक्त करत आमदार केराम यांनी खंडपीठात याचिका दाखल केली. त्यामध्ये नांदेड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना व भोकरच्या जि. प. विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना ५० लाखांपुढच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्याचा अधिकार नाही. केराम हे किनवट-माहूर मतदारसंघातील लोकनियुक्त आमदार असून त्यांच्या कामांना मान्यता देणे अपेक्षित होते. असे नमूद करत सत्तेत सहभागी झालेल्या पक्षातील आमदारांची सर्व कामे मंजूर केल्याच्या नाराजीतून याचिका दाखल केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com