हेल्थकेअर पॉलिसीच्या फ्रॉडने औरंगाबादमध्ये खळबळ

कंपनीचा अध्यक्ष पोलिसांच्या ताब्यात
हेल्थकेअर पॉलिसीच्या फ्रॉडने औरंगाबादमध्ये खळबळ

औरंगाबाद - Aurangabad

2005 साली मुंबईत (Mumbai) स्थापन झालेल्या या कंपनीच्या औरंगाबादमधील शाखा 2015 मध्ये ज्योतीनगरात स्थापन झाली होती. दरमहा 350 रुपये असे 20 महिने पैसे गुंतवल्यानंतर एकूण सात हजार रक्कम होईल. या रकमेचे 9 वर्षानंतर दामदुप्पट होऊन 14 हजार रुपयांचा परतावा घेऊन जाण्याचे अमिष ग्राहकांना दाखवण्यात आले होते. तसेच या नऊ वर्षांच्या काळात सर्व प्रकारच्या आरोग्य समस्यांसाठी (Mediclaim) मेडिक्लेमची सुविधाही देण्याचे सांगण्यात आले होते.

अतुल जाधव यांचा 30 ऑक्टोबर 2015 रोजी पॉलिसीचा कालावधी पूर्ण झाला. त्यामुळे मूळ पॉलिसी व पैसे भरणा पावत्या जमा करून कंपनीच्या मुंबईतील मुख्य कार्यालयातून जाधव यांच्या नावाने 14 हजार रुपयांचा धनादेश आला. मात्र तो धनादेश वटलाच नाही. तेव्हा त्यांनी कंपनीच्या औरंगाबादमधील कार्यालयात धाव घेतली असता ते बंद दिसले. त्यानंतर अतुल जाधव यांनी उस्मानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केल्यानंतर औरंगाबादमध्येही या कंपनीचे जाळे किती फोफावले होते, हे उघड झाले. राज्यभरातही विविध ठिकाणी नंदलाल केसरसिंगविरोधात गुन्हे दाखल आहेत.

आतापर्यंत कंपनीने शेकडो जणांना फसवून 30 लाख 12 हजार 85 रुपयांना फसवल्याचे उघड झाले आहे. या फसवणुकीचा पुढील तपास करण्यासाठी ज्या-ज्या नागरिकांनी यात पैसे गुंतवले आहेत, त्यांनी पुढे येण्याचे आवाहन पोलीसांनी केले आहे. जेणेकरून या फसवणुकीची व्याप्ती कळू शकेल, व नागरिकांची पुढे होणारी फसवणूक थांबू शकेल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com