Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedहेल्थवर्कर्सच बूस्टर डोसपासून दूर!

हेल्थवर्कर्सच बूस्टर डोसपासून दूर!

औरंगाबाद-  aurangabad

ग्रामीण (Rural) तसेच शहरी भागांमध्ये काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस (Booster dose) घेणे आवश्‍यक असताना आजही २९ हजार ४४० आरोग्य कर्मचाऱ्यांनी बूस्टर डोस (Booster dose) घेतलेला नाही. विशेष म्हणजे ५५ हजार २७१ फ्रेंटलाईन कर्मचारीही तिसर्‍या डोसपासून दूर आहेत. दरम्यान, या कर्मचाऱयांचा जून महिन्याचा पगार थांबविण्यात येणार असल्याचा इशारा जि.प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे.

- Advertisement -

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला, तरी हळूहळू रुग्णसंख्या वाढत आहे, असे असतानाही अजूनही पहिला व दुसरा डोस घेतलेले नागरिक व कर्मचारी आहेत. विशेष म्हणजे आरोग्याचे काम करणारे डॉक्टर (Doctor) व कर्मचारीच डोस घेत नसल्याचे सांगण्यात आले.

दरम्यान, शहर व ग्रामीणमध्ये आरोग्याचे ४२ हजार ४०८ कर्मचारी आहेत. यापैकी १३ हजार कर्मचार्‍यांनी बूस्टर डोस (Booster dose) घेतला. अजूनही २९ हजार, ४४० कर्मचारी डोसपासून दूर आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांशिवाय फ्रंटलाईन वर्कर म्हणून ८१ हजार ८१९ कर्मचारी आहेत. यापैकी २६ हजार ५४८ जणांनी बूस्टर डोस (Booster dose) घेतला. ५५ हजार २७१ कर्मचारी यापासून दूर आहेत. त्यांनी तात्काळ बूस्टर घ्यावा अन्यथा जून महिनयाचे वेतन मिळणार नाही, असा इशारा मुख्य कार्यकारी अधिकारी नीलेश गटणे यांनी दिला आहे.

विशेष म्हणजे ६० वर्षांवरील नागरिकांना मोफत डोस आहे. इतरांना २९८ रुपये मोजावे लागणार आहेत. आरोग्य कर्मचारी व फ्र॑टलाईन वर्कर यांच्यासाठीही बूस्टट डोस (Booster dose) मोफत आहे. असे असतानाही ते डोस घेण्यासाठी पुढे येत नाहीत.

- Advertisment -

ताज्या बातम्या