प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ‘हेल्थ क्लिनिक’

शालेय प्रांगणात खेळण्यास मनाई
प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या तपासणीसाठी ‘हेल्थ क्लिनिक’

औरंगाबाद - Aurangabad

राज्यात 4 ऑक्टोबरपासून 5 वी ते 12 वी माध्यमाच्या (School) शाळा सुरू होत आहे. या शाळा सुरू करण्याचे आदेश जारी करताना राज्य सरकारने विविध मार्गदर्शक सूचना देखील विद्यार्थ्याच्या सुरक्षितेसाठी शिक्षक, पालक, शालेय प्रशासन यांना केल्या आहेत. यात प्रामुख्याने शाळा सुरू करताना प्रत्येक शाळेत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी हेल्थ क्लिनिक (Health Clinic) सुरू करण्याची सूचना (State Government) राज्य सरकारने केली आहे. यासाठी इच्छुक डॉक्टर (Doctor) व पालकांची मदत घेण्याचेही नमूद केले आहे.

राज्य सरकारच्या आदेशानुसार येत्या 4 ऑक्टोबरपासून राज्या सर्वत्र इयत्ता पाचती ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू होत आहे. राज्य सरकारने जाहीर केलेल्या अध्यादेशात शाळा सुरू करताना व शाळा सुरू केल्यानंतर घ्यावयाच्या काळजीसंदर्भात विविध उपाययोजना राबवून संबंधित सूचनांचे पालन करण्याचे सूचित केले आहे. यासंदर्भातील विविध अतिरिक्‍त मार्गदर्शक सूचना 24 सप्टेंबर रोजी शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने सहसचिव राजेंद्र पवार यांच्या स्वाक्षरीने जारी केल्या आहेत.

त्यात प्रामुख्याने पहिल्याच सूचनांत प्रत्येक शाळेत शालेय प्रशासनाने स्वतः किंवा सीएसआर निधीच्या मदतीने विद्यार्थ्यांसाठी हेल्थ क्लिनिक सुरू करण्याचे बजावले आहे. शाळेत प्रतिदिन या क्लिनिकच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे नियमितपणे टेम्परेचर तपासावे, सर्व शाळा संबंधित भागातील स्थानिक सरकारी आरोग्य केंद्रांशी संलग्न कराव्यात. या स्थानिक आरोग्य केंद्रांतील डॉक्टर व परिचारिकांची हेल्थ क्लिनिकसाठी मदत घेण्यात यावी, असेही सूचनेत नमूद केले आहे. तपासणीत ताप, सर्दी किंवा इतर आजार आढळून आल्यास संबंधित विद्यार्थ्यांची लगेच तपासणी करून त्यांच्या उपस्थितीबाबत निर्णय घ्यावा, असेही सूचित केले आहे. मात्र या क्लिनिक सुरू करण्याचे पालन प्रत्येक शाळेकडून केले जाईल का, याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे.

शाळा सुरू करताना शाळेत सध्यस्थितीत कुठल्याही प्रकारचे खेळ खेळण्यात येवू नयेत, असे राज्य सरकारने स्पष्टपणे बजावले आहेत. तसेच काही खेळ घ्यावयाचे असल्यास त्यासाठी शालेय साहित्य नियमित सॅनिटाइज करावे, खेळ खेळवताना दम लागणार्‍या विद्यार्थ्यांकडे कटाक्षाने लक्ष ठेवावे, खेळताना विद्यार्थ्यांत दोन मीटरचे अंतर व मास्क लावलेला असावा, सामूहिक खेळ जसे की, खो खो, कबड्डी खेळण्यात येवू नयेत. क्रिकेट, शारिरीक शिक्षण अशा प्रकारच्या खेळांना मुभा दिलेली आहे.

Related Stories

No stories found.