व्हीडीओ कॉलचे स्क्रीन शॉट व्हायरल करून महिलेचा छळ ; आरोपीला अटक

jalgaon-digital
2 Min Read

औरंगाबाद – aurangabad

नातेवाईक महिलेला ब्लॅकमेल (Blackmail) करून तिला नग्न व्हीडिओ कॉल (Video call) करण्यास भाग पाडले. हा नराधम येथेच थांबला नाही तर व्हीडिओ कॉलचे स्क्रीन शॉट (Screen shot) काढून ते व्हायरल देखील केले. अशाप्रकारे महिलेचा छळ केल्याच्या प्रकरणात जवाहरनगर पोलिसांनी (police) आरोपीला अंबड (जि.जालना) (Ambad District Jalna) येथून बेड्या ठोकल्या. आरोपीला १४ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिला.

या प्रकरणात २९ वर्षीय पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार पीडितेच्या लग्नाआधी दोन वर्षांपूर्वी सुट्यांमध्ये आरोपीचा नऊ वर्षांचा मुलगा पीडितेच्या घरी आलेला होता. तेव्हा त्यांच्याशी संपर्क साधण्यासाठी नवनाथने अँड्रॉइड मोबाईल दिला होता. त्या मोबाईलवरून आरोपी पीडितेला बोलायचा. त्यांच्यात बोलणे सुरू असतानाच नवनाथने तुझ्या बहिणीला समस्या आहेत. तिच्यासोबत संबंध ठेवता येत नाहीत. आता तूच माझ्याशी लग्न कर, नसता मी फाशी घेईन. मग तुझ्या बहिणीची मुले उघड्यावर येतील, असे बोलून तिला भावनिक केले. तिने लग्नाला नकार देत, माझ्या बहिणीचा संसार बर्बाद होईल, तू सांगशील तसे मी करेल, असे म्हणाली. त्यानंतर आरोपीने व्हीडिओ कॉल करून तिला नग्न होण्यास भाग पाडले. त्याच व्हीडिओ कॉलचे त्याने स्क्रीन शॉट काढून ठेवले होते.

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

व्हीडिओ केले व्हायरल

दरम्यान, पीडितेचे लग्न झाले. एप्रिल २०२२ मध्ये आरोपीने तिच्या अश्लील फोटोंचा आणि व्हीडिओ कॉलच्या स्क्रीन शॉटचा एक व्हीडिओ बनवला आणि तो नातेवाईकांना पाठवला. याबाबत पीडितेला माहिती मिळाल्यावर ती काही दिवस शांत राहिली. मात्र, आरोपी नराधम येथेच थांबला नाही. तर त्याने १६ सप्टेंबरला पुन्हा त्याचा मित्र आणि पीडितेच्या आतेभावाला व्हीडिओ पाठवले. या प्रकरणात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

Visual Story इन्स्टाग्रामवर सर्वाधिक फॉलोअर्स असलेली बॉलिवूड अभिनेत्री

अजून मोबाईलच सापडेना

आरोपीला शुक्रवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता, सहायक सरकारी वकील रविंद्र अवसरमोल यांनी आरोपीने गुन्ह्यात वापरलेला मोबाईल हस्तगत करायचा आहे. आरोपीने तो व्हीडिओ आणखी कोणाला पाठवला, याचा देखील तपास बाकी असल्याने आरोपीला पोलीस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

Share This Article
Leave a comment

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *