महिलेला अश्लील व्हीडिओ पाठवून छळ

आरोपी जेरबंद
महिलेला अश्लील व्हीडिओ पाठवून छळ

औरंगाबाद - Aurangabad

मेसेंजरच्‍या माध्‍यमातून ३० वर्षीय तरुणाने महिलेला अश्लील (Video) व्हिडिओ पाठवून तिचा मानसिक छळ केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी आरोपी शहबाज अन्‍सारी वाहेद अन्‍सारी याची न्‍यायालयीन कोठडीत रवानगी करण्‍याचे आदेश प्रथम वर्ग न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी दिले.

फिर्यादीनुसार, २९ ऑगस्‍ट रोजी फिर्यादीच्‍या मोबाइलवरील मेसेंजर अ‍ॅपवर एका अनोळखी व्‍यक्तीचा मेसेज आला. त्‍यावर फिर्यादीने कोण आहे, अशी विचारणा केली असता मी फेसबुकवर नवीन आहे आणि मला चांगले मित्र बनवायचे असल्याचा आरोपी शहबाज अन्‍सारी वाहेद अन्‍सारी (३०, रा. शबाना हॉस्‍पिटल समोर, शहाबाजार) याने फिर्यादीला मेसेज केला. मात्र फिर्यादीने त्‍याला उत्तर दिले नाही. त्‍यानंतर आरोपीने ३० ऑगस्‍ट ते १९ सप्‍टेंबरपर्यंत फिर्यादीच्‍या मेसेंजरवर अश्लील मेसेज आणि व्हीडिओ पाठवून अनेक वेळा व्हीडिओ कॉल करुन फिर्यादीला मानसिक त्रास दिला. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्‍यात गुन्‍हा दाखल करण्‍यात आला होता. त्यानंतर न्‍यायदंडाधिकारी डी. एस. वमने यांनी आरोपीला न्यायलयीन कोठडी सुनावली आहे.

Related Stories

No stories found.