मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज

उन्हाची काहिली वाढली 
मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज

औरंगाबाद - aurangabad

शहरात कमाल ४०.२ सेल्सिअस अंश तापमानाची (Temperature) नोंद झाली आहे. विभागातील सरासरी तापमान असून त्यात वाढ होण्याची शकयता नाही, मात्र, २२ ते २३ एप्रिलपर्यंत (Marathwada) मराठवाड्यातील काही भागात गारपीट आणि अवकाळी (rain) पाऊस पडण्याचा हवामान तज्ज्ञांचा अंदाज आहे.

शहरात उन्हाची काहिली कायम असून सकाळी ११ ते सायंकाळी पाचपर्यंत उन्हाची तीव्रता सर्वाधिक नोंदली गेली आहे. वाढत्या उन्हाचा जनजीवनावर परिणाम जाणवत आहे. शहरात शनिवारी ४०.२ सेल्सिअस अंश तापमानाची नोंद झाली आहे. तापमानात अधिक वाढ होण्याची शक्यता नाही. मात्र, मराठवाड्यासह सोलापूर जिल्ह्यात गारपीट आणि अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे, असे हवामान अभ्यासक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितले. मे महिन्यातील संभाव्य तापमानाची परिस्थिती पाहता पावसाळा लवकर सुरू होणे अपेक्षित आहे.

उन्हापासून नागरिकांनी स्वतःचे संरक्षण करावे. बाहेर पडताना उन्हापासून बचाव करण्यासाठी टोपी, उपरणे यांचा वापर करावा. थंड पाणी आणि पेयाचे सेवन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. उन्हाचा तडाखा वाढल्याने दुपारची वर्दळ तुरळक झाली आहे. बाजारपेठांतील गर्दीही कमी झाली असून सायंकाळनंतर गर्दी वाढत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com