खंडवा येथील गुरु पौणिमे निमित्त होणारे कार्यक्रम रद्द
अन्य

खंडवा येथील गुरु पौणिमे निमित्त होणारे कार्यक्रम रद्द

मध्य प्रदेश शासनाने १० जुलै पर्यत लॉकडाऊन केले आहे जाहीर

Rajendra Patil

मनवेल ता.यावल (वार्ताहर)

खंडवा (मध्य प्रदेश) येथे गुरु पौर्णिमेला दि.५ जुलै रोजी होणारे विविध धार्मिक कार्यक्रम करोणा या विषाणुजन्य आजारामुळे रद्द करण्यात आले असल्याची माहीती खंडवा येथीला धुनीवाले दादाजी दरबारातील विश्ववस्त यांनी दिली.

दि.३० जून पासून खंडवा येथे गुरुपौर्णिमा निमित्त जळगाव जिल्हाभरातील विविध गावातील दादा भक्तगण गुरु पौर्णिमेला खंडवा येथे पायी दिंडी व रेल्वेने मोठ्या सख्येने जातात.

मात्र करोणा या आजारामुळे मध्य प्रदेश शासनाने १० जुलै पर्यत लॉकडाऊन जाहीर केले असल्यामुळे धुनीवाले दादाजी मंदिर येथील सर्व कार्यक्रम यावर्षी रद्द करण्यात आले असून भावीकांनी गुरु पौर्णिमेला स्वःताच्या घरीच गुरुपौर्णिमा साजरी करावी व खंडवा येथे येणे टाळावे असे फलक जिल्हाभरातील धुनीवाले दादाजी दारबारांना भेटी देत आवाहन करीत आहे.

Deshdoot
www.deshdoot.com