औरंगाबाद- नगर रेल्वे मार्गाला 'ग्रीन सिग्नल'

17 सप्टेंबरला घोषणा?
औरंगाबाद- नगर रेल्वे मार्गाला 'ग्रीन सिग्नल'

औरंगाबाद - Aurangabad

मराठवाडय़ातील वाहतुकीचा वेग वाढविणारा औरंगाबाद- नगर (Aurangabad-Nagar) हा नवा रेल्वे मार्ग तयार करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारकडून प्रस्तावित केला जाणार असून त्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त करतील, अशी तयारी सुरू झाली आहे.

औरंगाबाद- मनमाड-नगर असा रेल्वेचा प्रवास 265 किलोमीटरचा आहे. नव्या मार्गामुळे 112 किलोमीटरचे अंतर कमी होईल असा दावा करत हा नवा मार्ग प्रस्तावित करण्यात आला आहे.

स्टील, कृषी, वाहन उद्योग, प्लास्टीक आणि पॅकेजिंग या क्षेत्रात होणारी वाढ लक्षात घेता हा मार्ग अधिक उपयोगी पडणार असल्याचे सांगण्यात येत आहे. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी अनेक उद्योगांशी चर्चा केल्यानंतर हा नवा प्रस्ताव तयार केला असून मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या भाषणात या प्रस्तावाला हिरवा कंदिल मिळण्याची शक्यता आहे. या मार्गासाठी आवश्यकता भासल्यास उद्योग मंत्रालयाकडूनही निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे पालकमंत्री सुभाष देसाई यांनी पत्रकारांना सांगितले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com