Friday, April 26, 2024
HomeUncategorizedपदवीधर मतदाराला मतदान करताना मास्क असणे आवश्यक ‍

पदवीधर मतदाराला मतदान करताना मास्क असणे आवश्यक ‍

औरंगाबाद – Aurangabad

औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ निवडणूक सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीकोनातून प्रशासनाच्यावतीने उपाययोजना करण्यात येत आहेत. निवडणुकीसाठी असलेल्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याबाबत काही आक्षेप असल्यास लेखी आक्षेप नोंदवावेत. त्याचबरोबर इतरही काही सूचना असल्यास थेट कळवाव्यात. तसेच कोविड 19 च्या अनुषंगाने खबरदारीचे उपाय देखील योजन्यात येत आहेत. निवडणूक प्रक्रियेदरम्यान प्रत्येक मतदाराला मास्क वापरणे बंधनकारक असेल, त्यासाठी राजकीय पक्षाने मतदारांत जागृती निर्माण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी केले.

- Advertisement -

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात औरंगाबाद विभाग पदवीधर मतदार संघ मतदान केंद्र प्रारूप यादी आणि कोविड 19 च्या अनुषंगाने निवडणूक प्रक्रियेतील बदल याबाबत त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत आयोजि बैठकीत चव्हाण बोलत होते. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. अनंत गव्हाणे, राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी चव्हाण म्हणाले, पदवीधर मतदार संघाच्या मतदान केंद्रांची प्रारूप यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या मतदान केंद्रांवर पुरूष, महिला आणि दिव्यांग व ज्येष्ठ मतदारासाठी रांगा असतील. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त एक हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. शिवाय मतदार मास्क लावून रांगेत वर्तुळ केलेल्या ठिकाणी उभे राहील. शारीरिक अंतर राखण्यात येईल. ज्येष्ठ नागरिक 80 वर्ष व त्यावरील मतदार आणि कोविड 19 बाधित रुग्ण, दिव्यांग मतदारांना टपाली मतपत्रिकांची सुविधा उपलब्ध असेल. या निवडणुकीत अधिकाधिक मतदान करण्याबाबत सर्वांनी मतदारांत जागृती निर्माण करावी, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी गव्हाणे यांनीदेखील राजकीय पक्षाच्या प्रतिनिधींना मार्गदर्शन केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या