
नाशिक | प्रतिनिधी | Nashik
राज्यपाल रमेश बैस (Governor Ramesh Bais) आज (दि.26) नाशिकच्या दौऱ्यावर येत आहेत, याप्रसंगी नाशिकमध्ये त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांंचे आयोजन करण्यात आले आहे.
राज्यपाल पदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर पहिल्यांदाच बैस नाशिकला येत असल्याने प्रशासनाने दौऱ्यासाठीची जय्यत तयारी केली आहे. बैस सकाळी 9.30 ला राजभवनातुन नाशिकडे रवाना होतील. 10.20 ला त्यांचे सपकाळ नॉलेज हबच्या मैदानावर आगमन हाईल.
त्यानंंतर ते 11 ला त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) येथे दर्शनाला जातील. त्यानंतर पहिने (ता. त्र्यंबकेश्वर) या गावाला ते सव्वा बाराला भेट देतील. त्यानंतर त्यांचे नाशिक शहरात 12.50 वाजत पोलिस कवायत मैदानावर आगमन होणार आहे.
एक ते सव्वा दोन या कालावधीत गोल्फ क्लब (golf club) विश्राम गृहात असतील, त्यानंतर कालिदास कलामंदिर येथे नाशिक एज्युकेशन सोसायटीच्या शतक महोत्सव सांगता समारंभास ते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील.
दुपारी चारला ते सार्वजनिक वाचनालयाला सदीच्छा भेट देतील. या भेटीनंतर साडे चारला पंचवटीमधील श्री. काळाराम मंदिरात (Kalaram temple) दर्शन घेतील. साडे पाचला ते शिर्डीकडे प्रयाण करतील. असे त्यांच्या दौऱ्याचे एकूण नियोजन असणार आहे.
पोलीस सज्ज...
दरम्यान राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस दलाच्या वतीने चोख पोलीस बंदोबस्त सज्ज करण्यात आळा आहे. राज्यपालांच्या दौऱ्यात कोणत्याही प्रकारे खंड पडू नये; तसेच अनुचित प्रकार होऊ नये, याची पुरेपूर दक्षता पोलीस प्रशासन घेत आहे.