Friday, April 26, 2024
HomeUncategorizedउद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध-उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगांच्या पायाभूत सुविधांसाठी शासन कटिबद्ध-उद्योगमंत्री उदय सामंत

छत्रपती संभाजीनगर – Chhatrapati Sambhajinagar

जिल्ह्याच्या औद्योगिक विकासात महत्वपूर्ण असलेल्या चिकलठाणा एमआयडीसी (midc) येथील रस्त्यांसाठी शासनाने 70 कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून चांगले रस्ते होणार असल्याने उद्योगांची भरभराट होणार आहे. शिवाय जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्रास चालना देणारे पोषक वातावरण असल्याने पायाभूत सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता शासन कटिबद्ध असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत (Industries Minister Uday Samant) म्हणाले.

- Advertisement -

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ अंतर्गत चिकलठाणा, शेंद्रा औद्येागिक क्षेत्रातील विविध विकास कामांचे भूमिपूजन उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते आज झाले. यावेळी पालकमंत्री संदिपान भुमरे, सहकार मंत्री अतुल सावे, मसीआचे अध्यक्ष किरण जगताप यांची उपस्थिती होती.

सामंत  म्हणाले की, शासन उद्योगाच्या भरभराटीसाठी अनेक योजना राबवित आहे. मुख्यमंत्री रोजगार निर्मिती योजनेअंतर्गत 12 हजार 650 नवउद्योजक  घडविण्यात आले आहेत. तसेच नवसंजीवनी योजना तर उद्योजकांसाठी संजीवनी ठरत आहे. एमआयडीसी  क्षेत्रात पायाभूत सुविधा देण्यात येत आहेत. रस्त्यासाठी देण्यात आलेल्या निधीमधून मजबूत रस्ते तयार होतील आणि येथील उद्योगाची भरभराट होईल, असेही ते म्हणाले. भुमरे म्हणाले या क्षेत्रातील रस्त्यांसाठी निधी देण्याची मागणी खूप वर्षांपूर्वीची आहे. शासनाने रस्त्यांसाठी निधी देऊन जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाला खूप मोठी मदत केलेली आहे. उद्योजकांचे अनेक प्रश्न आहेत ते सोडविण्यासाठी मुंबईत बैठक घेण्याची ‍विनंती त्यांनी यावेळी केली.

रस्त्यांचा विकास  महत्त्वाचा
औद्योगिक  विकासामध्ये  गावातील  रस्त्यांचा विकास महत्वपूर्ण असल्याचे उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले. पाटोदा येथे रस्त्यांच्या भूमिपूजन कार्यक्रम प्रसंगी  ते बोलत होते. गेवराई तांडा ते पाटोदा या रस्त्यासाठी 16 कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर केला असल्याचे जाहीर केले. या निधीमधून रस्त्याचे रुंदीकरण व मजबुतीकरण करण्यात येणार असल्याचे तसेच धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गापर्यंत  बांधकाम व डांबरीकरण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.  

उदय सामंत म्हणाले की जागतिक पातळीवर आदर्श गाव म्हणून पाटोदा गावाचा लौकिक आहे.  जिल्हा नियोजनमधून शाळेसाठी निधी उपलब्ध करून द्यावा जेणेकरून शिक्षण आणखी दर्जेदार होईल, असेही ते म्हणाले. पालकमंत्री संदिपान भुमरे म्हणाले औद्योगिक  क्षेत्राच्या विकासात रस्ते खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. म्हणून दिलेला निधी महत्वपूर्ण आहे,या गावातील शेतीला जोडणारे पाणंद रस्ते पूर्ण करण्यासाठी  रोहयो विभागामार्फत  निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्याचप्रमाणे गावात पेव्हर ब्लॉकच्या माध्यमातून अंतर्गत रस्त्याचे सुशोभीकरण करण्यात येणार आहे. पाटोदा गावच्या आदर्श शाळेसाठी निधी देण्यात येणार असल्याची ग्वाही पालकमंत्र्यांनी यावेळी दिली. आमदार संजय शिरसाठ यांनी आदर्शगाव पाटोदा येथे पालकमंत्री आणि  उद्योग मंत्री  उदय सामंत यांनी भेट दिल्याबद्दल व निधी दिल्याबद्दल धन्यवाद व्यक्त केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या