Monday, April 29, 2024
HomeUncategorizedटोकियो ऑलिम्पिकला गुगलची सलामी; डूडलवर खेळता येणार गेम्स

टोकियो ऑलिम्पिकला गुगलची सलामी; डूडलवर खेळता येणार गेम्स

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

आजपासून टोकियो ऑलिम्पिक (Tokyo Olympics) स्पर्धेला सुरुवात झाली आहे. या अनुषंगाने गुगलने (Google) डूडल चॅम्पियन आयलँड गेम (Doodle Champion Island Game) लॉन्च केला आहे. यात ७ मिनी गेम्ससह (Mini Games) अनेक स्पर्धांचा समावेश करण्यात आला आहे…

- Advertisement -

स्केटबोर्डिंग, आर्चरी, रब्बी, टेबल टेनिस, स्विमिंग, क्लाईमिंग आणि मॅरोथॉन असे अनेक गेम्स युझर्सला खेळता येणार आहे. तसेच युजर्स रिअल टाईममध्ये निंजा कॅट गेमदेखील खेळू शकणार आहेत. गेममध्ये युजरसाठी ब्लू, रेड, ग्रीन, यलो अशा चार टीम्सची विभागणी करण्यात आली आहे…

कोरोना (Corona) संकटामुळे ऑलिम्पिक (Olympics) गेम्स वर्षभर पुढे ढकलण्यात आले. आजपासून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेला (International competition) सुरुवात झाली आहे. यात भारतासह जगभरातील स्पर्धकांनी सहभाग नोंदविला आहे.

स्पर्धेत भारतातील (India) 120 खेळाडूंचा समावेश आहे. अधिकारी, सपोर्ट टीम्स आणि कोच मिळून जपानमध्ये यंदा 228 जणांची टीम पाठवण्यात आली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या