अरेरे! गुगल करणार 'हे' फिचर बंद; जाणून घ्या सविस्तर

अरेरे! गुगल करणार 'हे' फिचर बंद; जाणून घ्या सविस्तर

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | New Delhi

गुगलने (Google) एक जुने फिचर (Feature) लवकरच बंद होण्याची घोषणा केली आहे. 30 सप्टेंबरपासून गुगल बुकमार्क्स (Google Bookmarks) हे फिचर युझर्ससाठी बंद करण्यात येईल. याबाबत गुगल बुकमार्क्सच्या पेजवरील बॅनरवर सूचना देण्यात आली आहे...

गुगल बुकमार्क्स हे 16 वर्ष जुने फीचर आहे. हे फीचर आता सर्व युजर्ससाठी बंद करण्याचा निर्णय गुगलने घेतला आहे. 30 सप्टेंबर 2021 पासून याची अंमलबजावणी होणार आहे.

हे फीचर बंद होणार असल्याने ज्या युजर्सनी आपल्या आवडत्या वेबसाईट्स बुकमार्क्सवर सेव्ह करून ठेवल्या आहेत त्या युझर्सना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आपला डेटा डिलिट (Delete) होऊ नये म्हणून गुगलने युजर्सला बुकमार्क्सवरील सर्व डेटा एक्सपोर्ट (Export) करायला सांगितले आहे.

असा करा डेटा एक्सपोर्ट

गुगल बुकमार्क्स सुविधा 30 सप्टेंबर 2021 ला बंद होणार आहे. त्यामुळे गुगलने बुकमार्क्सवरील सर्व डेटा एक्सपोर्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी युजर्सने google.com/bookmarks वर जाऊन Export Bookmarks वर क्लिक करावे. त्यानंतर युजर आपला डेटा कॉपी (Copy) करु शकतील.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com