Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedGood news दीड वर्षात पहिल्यांदाच शहरात एकच बाधित

Good news दीड वर्षात पहिल्यांदाच शहरात एकच बाधित

औरंगाबाद – Aurangabad

कोरोनाची (corona) दुसरी लाट आता शहरातून हद्दपार होण्याच्या मार्गावर आहे. शनिवारी शहरात कोरोनाचे 2 रुग्ण निघाले होते. तर दुसर्‍या दिवशी रविवारी शहरात केवळ एकच बाधित निघाला. मागील दीड वर्षांत पहिल्यांचा शहरात एकच पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे. ही बाब शहरासाठी दिलासादायक मानली जात आहे. सद्यःस्थितीत शहराच्या विविध रुग्णालयांत 74 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.

- Advertisement -

मागील दीड वर्षापासून औरंगाबाद शहरात कोरोना संसर्गाने थैमान घातले आहे. चढ-उतारानुसार रोज शहरात कोरोना रुग्ण आढळत आहेत. पहिल्या लाटेच्या तुलनेत शहरासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाने अधिक थैमान घातले होते. मार्च, एप्रिल, मे या तीन महिन्यात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेत शहरात रोजचे सातशे ते हजार कोरोना रुग्ण आढळून येत असल्याने शहरात परिस्थिती चिंताजनक बनली होती. त्यावेळी बाधितांना उपचारासाठी बेड्स कमी पडल्याने परिस्थिती हाताबाहेर गेली होती.

दरम्यानच्या काळात औरंगाबाद पालिकेसह जिल्हा प्रशासनाने (Aurangabad District Administration) प्रभावी उपाययोजना राबवल्या. त्यामुळे हळूहळू परिस्थितीत सुधारणा होवून कोरोना रूग्णांच्या वाढल्या संख्येला ब्रेक लागला. जून महिन्यानंतर शहरात कोरोना रुग्णांची संख्या घटण्यास सुरूवात झाली. मात्र ग्रामीण भागात रुग्ण वाढतच होते. पालिकेने शहरातील सर्व सहा एन्ट्री पॉइंट, (Airport, Railway Station) विमानतळ, रेल्वेस्टेशन व मोबाइल टीमद्वाारे आजवर बाहेरून येणार्‍या प्रत्येकाची कोरोना चाचणी केल्यानंतरच त्यांना शहरात प्रवेश दिला जात आहे. परिणामी, कोरोनाला रोखण्यात आला यश आले आहे. या पार्श्‍वभूमीवरच शनिवारी शहरात केवळ एक पॉझिटिव्ह निघाला. शनिवारी केलेल्या 716 चाचण्यांतून एकाचा अहवाल पॉझिटिव्ह निघाला.

शहरात सध्यस्थितीत 74 बाधितांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. यात मिनी घाटी अर्थातच सिव्हील रुग्णालयात एकही रुग्ण सध्या दाखल नाही. तर पालिकेच्या मेल्ट्रॉन कोविड रुग्णालयात 8, घाटीत 14, कोविड केअर सेंटरमध्ये 4 तर होम आयसोलेशनमध्ये 20 रुग्ण उपचार घेत आहेत. सर्वाधिक 28 बाधित खासगी रुग्णालयांत उपचार घेत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या