Friday, April 26, 2024
HomeUncategorizedजिल्हा परिषद शिक्षकांना 'वर्क फ्रॉम होम'ची संधी द्या!

जिल्हा परिषद शिक्षकांना ‘वर्क फ्रॉम होम’ची संधी द्या!

औरंगाबाद – Aurangabad

सध्या जिल्ह्यातील कोरोनाची परिस्थिती अत्यंत गंभीर बनत आहेत. एकीकडे पहिली ते आठवीच्या सर्व मुलांना विनापरीक्षा पास करण्याचा निर्णय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी घेतला आहे तर कोरोना कालावधीत जिल्हाधिकारी यांनीही शाळेच्या सर्व शिक्षकांना 50 टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे पत्र काढले आहे. मात्र सध्याची परिस्थती पाहता शिक्षकांना वर्क फ्रॉम होम करण्याची मुभा देण्याची मागणी शिक्षक समितीने मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -

सध्याच्या परिस्थितीत अनेक शिक्षक कोरोना कामी कर्तव्य बजावत आहेत. जिल्ह्यातील जवळपास 10 ते 15 शिक्षक कोरोनामुळे मृत्यूही पावले आहेत. त्यात दररोज शाळेत बोलावणे या परिस्थितीत उचित ठरणार नाहीत.

मुलांना ऑनलाइन पध्दतीनेच अभ्यास देणे सुरु आहे. एप्रिल महिन्याचा शालेय पोषण आहार बहुतेक शाळेने वाटप केला आहे. शाळा सिद्धी ऑनलाइन पध्दतीने भरावयाचे आहे. यू डायस माहिती ऑनलाइन पद्धतीने भरता येईल, अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच शिक्षकांना शाळेत बोलवावे.

बहुतेक शिक्षकांचे नातेवाईक कोरोनाचा सामना करत आहेत. त्यामुळे सर्व परिस्थितीचा विचार करून सर्व शिक्षकांना वर्क फ्रॉम होमची मुभा शासनाने द्यावी, अशी मागणी शिक्षक समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या