औद्योगिक वीज भारात बदल करण्यासाठी मुदतवाढ द्या

सीएमआयएची मागणी
औद्योगिक वीज भारात बदल करण्यासाठी मुदतवाढ द्या

औरंगाबाद - Aurangabad

कोरोनाची महामारीच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यात पुन्हा एकदा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. अनेक कामगार गावाकडे निघून गेले आहेत किंवा भीतीमुळे कामावर येण्याचे टाळत आहेत ज्याचा फटका पुन्हा एकदा औद्योगिक क्षेत्राला बसला आहे. वीज ग्राहकांना वीज ग्राहकांना मागणीमध्ये महिन्यातून तीन वेळेस बदल करण्याची मुदत वाढवून देण्याची मागणी सीएमआयएतर्फे अध्यक्ष कमलेश धूत व सचिव सतीश लोणीकर यांनी वीज नियामक आयोगाकडे केली आहे.

देशात व राज्यात मार्च २०२० मध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आला होता. राज्य सरकारने उद्योगाना अनेक अटी व शर्ती सहित कारखाने सुरू करण्याची परवानगी दिली होती. करोनाच्या महामारीमुळे अनेक कामगार कारखाने सोडून आपल्या गावी निघून गेले होते. या सर्वावर मात करीत उद्योजकांनी भरारी घेत मागील ६-८ महिन्यापासून अर्थव्यवस्था पुन्हा एकदा रूळावर आणण्याचा प्रयत्न केला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com