Tuesday, April 23, 2024
HomeUncategorizedअमृत महोत्सवानिमित्त ७५ गरजू महिलांना साड्यांची भेट!

अमृत महोत्सवानिमित्त ७५ गरजू महिलांना साड्यांची भेट!

औरंगाबाद – aurangabad

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त शहरातील गरीब, कष्टकरी  महिलांना त्यांच्या आवडीच्या साडीची भेट मिळाली. आस्था जनविकास संस्थेच्या (Astha Jan Vikas Sanstha) वतीने ‘साडी बँक’ (Sari Bank) उपकमाअंतर्गत ७५ महिलांना नव्या कोऱ्या १५० साड्या भेट देण्यात आल्या. अचानक मिळालेल्या साडीने महिला भारावल्या. तर त्यांचा आनंद संस्थेच्या स्वयंसेवकांना समाधान देऊन गेला.

- Advertisement -

आस्था जनविकास संस्थेने दोन वर्षापासून दुर्लक्षित, आर्थिकदृष्ट्या मागास कुटुंबातील महिलांसाठी ‘साडी बँक’उपक्रमाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत राष्ट्रीय, धार्मिक सण व महत्त्वाच्या दिवसानिमित्त गरजू महिलांना नव्या कोऱ्या साड्या भेट दिल्या जातात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त संस्थेने मातीकाम करणाऱ्या ७५ कष्टकरी महिलांचे नव्या कोऱ्या साडीचे स्वप्न पूर्ण केल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्ष डॉ. आरतीश्यामल जोशी यांनी दिली.

बीड बायपास रोडवर मातीकाम, धुणीभांडी, गवंडी काम करणाऱ्या अनेक महिला पालीमध्ये राहतात. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त सर्वत्र उत्साहाचे वातावरण असताना या उपेक्षित वर्गातील महिला या आनंदापासून दूर होत्या. त्यांच्या आयुष्यातही आनंदाचे काही क्षण देण्यासाठी आस्थाच्या वतीने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या अंतर्गत ७५ महिलांना प्रत्येकी दोन अशा १५० हून अधिक साड्या भेट देण्यात आल्या. या उपक्रमासाठी समाजातील दानशूर लोकांनी साड्या भेट दिल्या होत्या. उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. आरतीश्यामल जोशी, मंगला जोशी, अर्चना सोनवणे, संगीता गुणारी, मंजुषा माळवदकर, पौर्णिमा वहाने आदींनी सहकार्य केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या