Thursday, April 25, 2024
HomeUncategorizedऔरंगाबादच्या जीआय वन हॉस्पिटलला ‘एनएबीएच’ मानांकन

औरंगाबादच्या जीआय वन हॉस्पिटलला ‘एनएबीएच’ मानांकन

औरंगाबाद – aurangabad

पोटविकार व लिव्हर रुग्णांसाठी अविरत सेवा देणाऱ्या (GI One Hospital) जीआय वन हॉस्पिटलला एनएबीएच (NABH) अर्थात ‘नॅशनल एक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स’चे मानांकन मिळाले आहे. (Marathwada) मराठवाडा व (Khandesh) खान्देशातील हे मानांकन मिळवणारे पहिलेच हॉस्पिटल ठरले आहे.

- Advertisement -

वर्ष २०१९ मध्ये परिसरातील तरुण डॉक्टरांच्या टीमने एकत्र येऊन सुरू केलेले जीआय वन हॉस्पिटलने एक आगळेवेगळे स्थान निर्माण केले आहे. दिल्ली येथील ‘नॅशनल एक्रिडिटेशन बोर्ड ऑफ हॉस्पिटल्स’ च्या वतीने मानांकन देण्यात आले आहे. जीआय वन हॉस्पिटलमध्ये सर्व अद्ययावत अशा सोयीसुविधा उपलब्ध एनएबीएच मानांकनात असलेल्या अत्यंत कठोर अशा निकषांमध्ये हे हॉस्पिटल उत्कृष्ट ठरले.

कोणत्याही प्रकारची तडजोड न करता येणाऱ्या या निकषांमध्ये अद्ययावत उपचार सुविधा, प्रशिक्षित स्टाफ, प्रशिक्षित डॉक्टर्स, नर्सिंग स्टाफ, साफसफाई कर्मचाऱ्यांची पाहणी करून मूल्यांकन करण्यात आले. इतकेच नव्हे तर रुग्णांचे समाधान, उपचारापूर्वी व त्यानंतर संभाव्य खर्चाची माहिती, जोखमीची माहिती याबाबत समुपदेशन केले जाते. रुग्णालयाच्या वैद्यकीय नोंदी, जैव वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट यांच्या नोंदीदेखील मूल्यांकनात समाविष्ट आहेत. या सर्व निकषांचे तंतोतंत पालन झाले तरच मानांकन प्राप्त होते. आमच्या रुग्णालयाने सर्व बाबीची पूर्तता केल्यानंतरच हे यश मिळवले आहे असे डॉक्टरांनी सांगितले. या मानांकन प्राप्तीचे श्रेय सर्व रुग्ण, कर्मचारी, डॉक्टर, नर्स यांना जाते असे आवर्जून सांगितले.

रेल्वे स्टेशन रोडवर गोल्डी सिनेमाच्या बाजूला असलेल्या जीआय वन हॉस्पिटलमध्ये पोटविकार निदान व उपचार क्षेत्रात एकाच छताखाली पोटाशी निगडित सर्व उपचार केले जातात. येथे मेडिकल व सर्जिकल गॅस्ट्रोएन्टेरोलॉजीचे डॉक्टर एकत्र काम करून त्या-त्या आजाराच्या रुग्णांना एकाच छताखाली उच्च गुणवत्तेच्या निदान व उपचार प्रणालीचा उपयोग करून लवकरात लवकर बरे करण्यास मदत मिळते.

- Advertisment -

ताज्या बातम्या