Wednesday, April 24, 2024
HomeUncategorizedमहत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा!

महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा!

औरंगाबाद – aurangabad

राज्यात पुढील 7 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा हवामान विभागाने (Meteorological Department) वर्तविला आहे. राज्यातील 12 जिल्ह्यांना हवामान विभागाने (Yellow alert) यलो अलर्ट जारी केला आहे. पुढील तीन दिवस महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा, अशा सूचना हवामान विभागाने नागरिकांना दिल्या आहेत.

- Advertisement -

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कमाल (Temperature) तापमानात वाढ होत आहे. या वाढत्या तापमानामुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त होत आहे. राज्यात बऱ्याच ठिकाणी तापमान 40 अंशांच्याही पुढे गेले आहे. वाढत्या तापमानाचा परिणाम शरीरावर व आरोग्यावर होताना दिसून येत आहे.

दोन दिवसांत राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान चांगलेच वाढले आहे. पुढील तीन दिवस राज्यातील अनेक पुढील तीन दिवस या जिल्ह्यांमध्ये उष्णतेची तीव्र लाट:

रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा, उत्तर महाराष्ट्रातील अहमदनगर, जळगाव, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, अकोला, भंडारा या जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यावरून मराठवाड्यासह कोकण, पश्चिम महाराष्ट्रात आणि विदर्भात उष्णतेचा चटका वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

गेल्या काही दिवसांपासून राज्यात उन्हाचा तडाखा वाढला आहे. विदर्भात उष्णतेची लाट आहे. पण, उन्हाच्या झळा कमी होऊन राज्यात परत पावसाचं आगमन होणार आहे. पुढील चार ते पाच दिवसांत काही ठिकाणी गडगडाटासह जोरदार वारे आणि पावसाची शक्यता आहे. याबाबत हवामान विभागानं अंदाज वर्तवला आहे.

राज्यात तापमानात वाढ होत असून उन्हाचा कडाका वाढलेला आहे. विदर्भात सध्या उन्हाचे चटके जाणवू लागले आहेत. पुढील पाच दिवसांत उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून तापमान ४२ अंशाच्या वर जाण्याची शक्यता आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या