अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा-जिल्हाधिकारी

अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडा-जिल्हाधिकारी

औरंगाबाद - aurangabad

दिवाळीच्या (Diwali) सणाला प्रारंभ होत आहे. अशा परिस्थितीत नागरिकांनी प्रवास, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे. (corona) कोविडचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करत समाजात वावरण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण (Collector Sunil Chavan) यांनी नागरिकांना केले आहे.

पुढे बोलताना चव्हाण म्हणाले की, कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या अनुषंगाने आवश्यक मास्क परिधान करणे, वारंवार हात धुणे आणि सामाजिक अंतराच्या त्रिसूत्रीचा अवलंब करावा.

प्रवासामुळे, गर्दीच्या ठिकाणी गेल्यामुळे आणि कोविड नियमांचे पालन न केल्यामुळे औरंगाबाद शहरात २३ ते २७ या कालावधीत मनपा क्षेत्रातील करण्यात आलेल्या चाचण्यांमध्ये शहरातील विविध भागातील २७ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले.

आढळलेल्या रुग्णांत २४ आरटीपीसीआर, ३ अँटिजेन प्रक्रियेत पॉ‍झिटिव्ह आढळले. या २७ रुग्णांपैकी ५५ जण हाय रिस्क कॉटँक्टमध्ये असल्याने त्यांच्यापैकी ४९ जणांनी चाचणी केली. त्यात ०५ पाच पॉझिटिव्ह आढळले, तर सहा जणांनी चाचणी केलीच नाही. यामुळे असे लक्षात आले की अधिकांश रूग्ण गर्दीच्या ठिकाणी गेल्याने प्रवास केल्याने बाधित झालेले आहेत. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो प्रवास करणे, गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे, जर घराबाहेर जाणे खूपच महत्त्वाचे, अत्यावश्यक असल्यासच कोरोना नियमांचे पालन करावे. तसेच नागरिकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे, असेही आवाहन चव्हाण यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com